नवी दिल्ली : देशातील बँकांना हजारो कोटींचा गंडा लावणाºया विजय माल्ल्याकडे एक रुपयादेखील नसून तो कंगाल झाला आहे. त्याच्या वकिलालाही देण्यासाठीही पैसे उरलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. विजय माल्लयाने एक तातडीचा अर्ज यु.के.च्या न्यायालयात दाखल केला आहे. ज्या अर्जात त्याने त्याचे बँक अकाऊंट हाताळण्याची संमती मागितली आहे. एवढेच नाही तर फ्रान्समधली संपत्ती विकल्यानंतर जे पैसे आले आहेत़ त्यातले १४ कोटी रुपये देण्यात यावेत, असेही विजय माल्ल्याने म्हटले आहे.
विजय माल्ल्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ही बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत, असेही त्याने म्हटले आहे. कर्ज घोटाळा केल्याचा जो खटला सुरु आहे़ त्याची फी भरण्यासाठी आपल्याला पैसे हवे आहेत, असेही विजय माल्ल्याने या अर्जात नमूद केले आहे. वेळेत फी दिली नाही तर आपण खटला लढणार नाही असे विजय माल्ल्याच्या वकिलाने त्याला सांगितले आहे़ त्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत. भारतातल्या एसबीआयसह प्रमुख बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्या फरारी आहे़
पोलिस अधिका-याचे पोलिस महिलेशी संबंध, बायकोने रंगेहाथ पकडले