21.8 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home विशेष ...चर्चा तर होणारच !

…चर्चा तर होणारच !

एकमत ऑनलाईन

देशातील कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. मात्र कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने कोरोनाचे भय मात्र कमी झाले आहे. काळजी करणे कमी होणे ही बाब चांगली असली तरी पुढील काही काळ काळजी घ्यावीच लागणार आहे. आजही राज्यात रोज सरासरी २० हजार नवे रुग्ण सापडत असून एकट्या सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेपाच लाख रुग्णांची भर पडली आहे. काळजी घेतली नाही तर कोरोनाची दुसरी लाट येईल व पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या लसीवर जगभरात जोरात संशोधन सुरू असले तरी प्रत्यक्षात ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखी किमान सहा महिने लागतील.

त्यामुळे तोवर काळजी घेतानाच हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर करून कोरोनासोबत जगण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रातही सुशांत प्रकरण, त्यानिमित्ताने पुढे आलेले बॉलिवूडमधील अमली पदार्थांचे रॅकेट, एनसीबीने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची सुरू केलेली चौकशी आदी विषय सध्या गाजत आहेत. त्यावर चर्चा रंगत आहेत. त्यातच शनिवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाल्याने चर्चेला नवा विषय मिळाला आहे. यावरून सध्या वेगवेगळे तर्क-वितर्क सुरू झाले असून महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात राजकीय भूकंप होणार अशी भाकितं व्यक्त केली जात आहेत.

भाजप-शिवसेनेतील संघर्ष व कटुता विकोपाला गेलेली असताना अचानक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास चाललेल्या या भेटीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या जागांचे समसमान वाटप करण्यास भाजपाने नकार दिला. शिवसेनेने हा नकार पचवला, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा सांगून त्यावर ठाम भूमिका घेतली. भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेने दोन काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपाला धक्का दिला. राजकारणाच्या या नव्या मांडणीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका मोठी होती.

अग्रीकल्चर टेरिफ नुसार वीज शुल्क आकारणी करण्यात यावी, भूमच्या शेतकऱ्यांची मागणी

हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास काढून घेतल्याने शिवसेनेवर, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तर भाजपाचा राग आहेच, पण त्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या व भाजपावर सतत तिखट शब्दांत आगपाखड करणा-या संजय राऊत यांच्यावर त्यांचा दुप्पट राग आहे. संजय राऊत यांनी दै. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्याचे प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचा खुलासा भाजपकडून करण्यात आला. स्वत: फडणवीस यांनीही ‘सामना’साठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांना काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

भेटीचा सुप्त हेतू काय?
दै. ‘सामना’च्या मुलाखतीसाठी भेट झाल्याचा दावा खरा असेलही, पण केवळ तेवढ्याच कारणासाठी ही भेट झाली असेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अशी भेट झाल्यास त्याचे राजकीय संदर्भ काढले जातील याची जाणीव या दोन्ही नेत्यांना नक्कीच असणार. तरीही ही भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांची ‘सामना’साठी स्वत: संजय राऊत यांना मुलाखत घ्यावी वाटते, हाच एक मोठा संदेश आहे. कारण ठाकरे परिवार वगळता त्यांनी अलीकडच्या काळात फक्त शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. तीही ही नवी आघाडी झाल्यानंतर. त्यामुळे या भेटीतून राजकीय भूकंप होण्याची शक्यता नसली तरी किमान मध्यंतरीच्या काळात दोन पक्षांत निर्माण झालेला दुरावा, कटुता कमी करण्याचा प्रयत्न यामागे असावा असा तर्क काढला जात आहे.

या अडचणीच्या काळात केंद्र सरकारकडून पुरेसे साहाय्य मिळत नसेल तर कारभार चालवणे कठीण आहे याची जाणीव शिवसेनेलाही आहे. त्यामुळे संबंधातील कटुता थोडी कमी करण्याचा प्रयत्न यामागे असू शकेल. आघाडीचे सरकार चालवताना जेव्हा मित्रपक्ष दबाव वाढवतात तेव्हा त्यांनाही आमच्यापुढे आणखीही एक पर्याय उपलब्ध असल्याचे चित्र रंगवावे लागते. सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. त्यात तथ्य असो व नसो, पण राजकीय हेतूने चौकशीचे शुक्लकाष्ठ आपल्यामागे लागणार नाही ना? या भीतीपोटी तर तणाव दूर करण्याचे प्रयत्न नाहीत ना? असे अनेक तर्क व्यक्त केले जात आहेत. राजकारणात काहीच अशक्य नसते.

२०१३ साली मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर त्याला विरोध करून नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यांनी आपले कट्टर वैरी असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली. नितीशकुमार मुख्यमंत्री झाले तर पाकिस्तानात फटाके वाजतील, अशी जळजळीत टीका तेव्हा भाजपने केली. पण नंतर हेच दोघे एकत्र आले व मोदींमुळे एनडीए सोडून गेलेले नितीशकुमार त्यांचे परमभक्त झाले. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची अशक्य वाटणारी युती झाली. महाराष्ट्रात काँग्रेस व शिवसेनेची युती झाली. त्यामुळे भाजपा व शिवसेना कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, असे भाकित करणे धाडसाचे होईल.

स्वामी समर्थ केंद्रामध्ये पौर्णिमा मोहिते हिने केली सुंदर पेंटिंग

सुशांत प्रकरण : उपकथानकेच गाजतायत !
सुशांत प्रकरणामुळे पुढे आलेल्या बॉलिवूडमधील अमली पदार्थांच्या बजबजपुरीने सगळे लक्ष वेधून घेतले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबी याचा तपास करत असून दीपिका पदुकोणपासून बॉलिवूडमधील अनेक बड्या सिता-यांना एनसीबीच्या कार्यालयात बोलावून चौकशी सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशी चौकशीसाठी बोलावल्या जाणा-या तारे-तारकांची यादी एवढी वाढत चालली आहे की पुढचा चित्रपट पुरस्कार सोहळा एनसीबीच्याच कार्यालयात घ्यावा लागेल असे विनोदाने बोलले जातेय. या निमित्ताने बॉलिवूडमधील चुकीच्या गोष्टी समोर येत असतील तर चांगलेच आहे.
पण त्याचबरोबर या तपासाबद्दलही शंका व्यक्त होत आहेत. केवळ पाच-सहा वर्षांपूर्वीच्या व्हॉट्स अ‍ॅपच्या मेसेजेसवरून या लोकांना चौकशीसाठी बोलावले जात असेल तर आपण ड्रग्ज घेत होतो अशी जाहीर कबुली देणा-या कंगनाची चौकशी का होत नाही? असा प्रश्न केला जातो आहे.

गुप्तेश्वरांना बक्षिसी!
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारणारे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला आहे. नोकरी सोडल्यावर त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...