31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home विशेष ये जो पब्लिक है....

ये जो पब्लिक है….

एकमत ऑनलाईन

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे त्यांचा कोणता अभिनय त्यांच्या कोणत्या प्रवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे? त्यातील कोणती प्रवृत्ती खरी आहे आणि कोणती कायमस्वरूपी आहे? हे ओळखणे अत्यंत अवघड असते. जाती या शब्दाचा एक अर्थ लोकभाषेत स्वभावाशीही निगडित आहे. आपल्याकडे जाती हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो, त्याचा उगम वर्णव्यवस्थेत आहे. कामाच्या वाटपानुसार वर्णांचे रूपांतर जातीत नेमके कधी झाले हे शोधणे अवघड आहे. परंतु त्याच्याही आधीपासून जाती हा शब्द स्वभाव किंवा वृत्तीच्या संदर्भात वापरला जात आहे.

नेत्यांचे स्वभाव किंवा वृत्ती समजून घ्यायच्या असतील तर काश्मीरमधील नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या संमेलनाचा अभ्यास केला पाहिजे. जणूकाही वाघ आणि हरीण, मांजर आणि उंदीर, साप आणि मुंगूस एकत्र दिसावे, असा हा प्रसंग मानावा लागेल. स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या अनेक पिढ्या राजकारणात सक्रिय राहिल्या, ज्यांच्या राजकारणामुळे ‘भूलोकीचे नंदनवन’ मानले जाणारे काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीच्या छायेत आहे, जिथे ‘विशेष राज्य’ या नावाखाली दिली गेलेली प्रचंड मोठी रक्कम भ्रष्टाचारामुळे कारणी लागू शकली नाही, ज्यांच्यामुळे क्रूर दहशतवाद्यांना कंदाहारला नेऊन सोडावे लागले, तेच लोक आता एकत्र येऊन मखलाशी करू लागले आहेत.

डीडीसी म्हणजे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेन्ट कॉन्सिलच्या निवडणुका थेट घेता याव्यात यासाठी गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. सध्या या निवडणुकांकडे ‘मिनी असेम्ब्ली’ निवडणुका म्हणून पाहिले जात असून, या निवडणुकीत मतदानाचा अधिकार सर्वसामान्य जनतेला असेल. सुरुवातीला राज्यातील राजकीय पक्ष या निवडणुकीत अजिबात स्वारस्य नसल्याचे दाखवीत होते. पंचायत आणि ब्लॉक स्तरावरील निवडणुका स्थानिक पक्षांच्या सहभागाविनाच पूर्ण झाल्या आहेत. आता २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत डीडीसीच्या निवडणुका होतील आणि स्थानिक पक्ष त्यात सहभागी होणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षांनी आघाडी तयार केली असून, ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी) असे नाव या आघाडीला देण्यात आले आहे. हा एक प्रकारचा जाहीरनामाच असून, त्यावर स्वाक्षरी करणारा पक्ष या आघाडीचा सदस्य बनतो. अशा सर्व पक्षांच्या समूहाला ‘गुपकार आघाडी’ म्हटले जाते. जम्मू-काश्मीरला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा मिळवून देणे हा या आघाडीचा उद्देश आहे. गुपकार आघाडीत फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (मार्क्सवादी), पीपल्स मूव्हमेन्ट, पँथर्स पार्टी आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स सहभागी आहे. या गटात काँग्रेसचाही सहभाग असल्याचा उल्लेख गुपकार जाहीरनाम्यात आहे. परंतु पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेसचा या गटाशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ईश्वर चिठ्ठीने केल्या अनेकांच्या अपेक्षा भंग ; हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण सोडत संपन्न

श्रीनगरमधील एका रस्त्याचे नाव ‘गुपकार रोड’ असे आहे. याच गुपकार रोडवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचे निवासस्थान आहे. राज्यातून ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय झाला, त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ४ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरमधील काही पक्षांनी याच निवासस्थानी एकत्रितपणे बैठक घेतली होती. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सजाद लोन, पीपल्स मूव्हमेन्टचे नेते जावेद मीर, सीपीआय (एम) नेते मोहम्मद युसूफ तारिगामी आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुझफ्फर शाह उपस्थित होते.

राज्यात मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दलांची तैनाती झालेली असताना अत्यंत अनाकलनीय अशा वातावरणात ही बैठक झाली होती आणि राज्यातील परिस्थितीबद्दल या पक्षांनी एक सामूहिक वक्तव्य जारी केले होते. त्यालाच ‘गुपकार समझोता’ असे नाव देण्यात आले होते. या करारात असे म्हटले आहे की, ‘‘जम्मू-काश्मीरची ओळख, स्वायत्तता आणि विशेष दर्जा सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जातील, असे सर्व पक्षांनी मिळून ठरविले आहे.’’

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’च्या स्थापनेनंतर म्हटले होते की, ही आघाडी जम्मू-काश्मीरच्या संबंधात घटनात्मक स्थिती ‘जैसे थे’ राहावी म्हणून प्रयत्न करेल. म्हणजेच गेल्या वर्षी पाच ऑगस्टच्या पूर्वीची स्थिती. त्यांनी म्हटले होते की, ‘‘जम्मू-काश्मीर आणि लडाखकडून जे हिसकावून घेण्यात आले आहे, ते परत मिळविण्यासाठी आम्ही संघर्ष करू. आमची लढाई घटनात्मक आहे. आम्ही (जम्मू-काश्मीरसंदर्भात) घटनात्मक स्थिती (जी पाच ऑगस्ट २०१९ पूर्वी होती) पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू.’’

गुपकार गटात सामील झालेले पक्ष देशविरोधी काम करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीपल्स अलायन्सला ‘गुपकार गँग’ असे नाव दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘‘गुपकार गँग ग्लोबल होत आहे. परदेशी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करावा, असे त्यांना वाटते. गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचाही अपमान करते. गुपकार गँगच्या या कारवायांना सोनिया आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे का? याबाबत त्यांनी भारताच्या जनतेला स्पष्टीकरण दिले पाहिजे.’’ केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे की, ‘‘गुपकार समूह ही वस्तुत: काँग्रेसचीच चाल आहे. गुपकार गटाचे गोपनीय इरादे नेस्तनाबूत केले जातील. एवढेच नव्हे, तर गुपकारच्या गुप्त कारवायांमुळे काँग्रेससुद्धा जमीनदोस्त होईल.’’

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

एकत्रितपणे निवडणूक लढवून ३७० कलम रद्द करण्याच्या भाजपच्या निर्णयाला विरोध करणे हे गुपकार गटाचे उद्दिष्ट आहे. जो पक्ष स्थापनेपासूनच ३७० कलम रद्द करण्याची शिफारस करीत आहे, ज्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा काश्मीरच्या तुरुंगात रहस्यमय मृत्यू झाला आहे, असा पक्ष जर केंद्रात सलग दुस-यांदा स्वबळावर सत्तेत आला असेल, तर असा पक्ष या गुपकार गटाच्या मनाप्रमाणे काम करेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. भाजपच्या निर्णयाला विरोध करणे हा राजकीय पक्षांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. परंतु ज्या प्रकारे एकमेकांविरुद्ध कायम लढलेले वेगवेगळे पक्ष एकत्र आले आहेत, ते पाहता या पक्षांचा स्वार्थ किती समान आहे, याचा अंदाज लावता येऊ शकतो. जनतेनेच आता अशा नेत्यांना आणि पक्षांना उत्तर द्यायला हवे; कारण काश्मीरचे भले करण्याच्या नावाखाली स्वत:चे भले करणा-यांचा कारभार लोकांनी अनेक वर्षे पाहिला आहे. परंतु लोकांनी त्यांना ओळखले आहे, हे आता या नेत्यांना समजायला हवे.

पाकिस्तानची भलामण आणि दहशतवाद हे काश्मीरमधील मूठभर लोकांच्या दृष्टीने ‘जीवनमूल्य’ असेल कदाचित; पण सर्वसामान्य काश्मिरी लोकांचे त्यात अजिबात हित नाही. कारण पुरातत्त्व खात्याच्या उत्खननात इसवी सन पूर्व ३००० ते इसवी सन पूर्व १००० या कालखंडातील सांस्कृतिक महत्त्वाचे चार पुरावे समोर आले आहेत. ते नवपाषाण युगाचे प्रतिनिधित्व करतात.

योगेश मिश्र
ज्येष्ठ स्तंभलेखक-विश्लेषक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या