23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeविशेषनव्या उच्चांकाच्या दिशेने...

नव्या उच्चांकाच्या दिशेने…

एकमत ऑनलाईन

भारतीय शेअर बाजारात आलेले तेजीचे वादळ अद्यापही कायम आहे. या वादळामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि बँक निफ्टी या दोन महत्त्वाच्या निर्देशांकांनी आपली आजवरची सार्वकालिक उच्चांक पातळी ओलांडून नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टीचा निर्देशांकही मागील उच्चांकापासून १०० अंकांनी दूर आहे. फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील निर्देशांकही लॉन्ग टर्म अपट्रेन्डला गेले आहेत. त्यामुळे या आठवड्यात निफ्टी नवी उच्चांक पातळी गाठताना दिसू शकतो. सरकारी कंपन्यांच्या समभागांच्या किमतीतील जबरदस्त वृद्धी हे या तेजीचे वैशिष्ट्य राहिले आहे. चालू आठवड्यात आरसीएफ आणि भेल या समभागांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ६१,४५६ अंकांवर चालू होऊन ६२,२९३ अंकावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ८३७ अंकांची वाढ झाली तर निफ्टी १८,२४६ अंकांवर ओपन होऊन १८,५१२ अंकांवर बंद झाला. निफ्टी २६६ अंकांनी वधारला. गेल्या आठवड्यात बँक निफ्टी ४२,२८६ ला ओपन होऊन ४२,९८३ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी जवळपास ६९७ अंक वधारला. निफ्टी १८६०० या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. केवळ १०० अंकांनी या पातळीपासून निफ्टी दूर आहे. सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात आजवरचा ६२,२४५ हा सार्वकालिक उच्चांक मोडून ६२,२९३ अंकावर क्लोजिंग दिली आहे. त्यामुळे निफ्टीही चालू आठवड्यामध्ये १८,६०० पार करेल असे सध्याचा ट्रेंड दर्शवत आहे. जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील निर्देशांकही लॉन्ग टर्म अपट्रेन्डला गेले आहेत. डाऊ जोन्स या अमेरिकेच्या निर्देशांकाने ३४,२८१ या महत्वाच्या पातळीच्या वर मागच्या आठवड्याची क्लोजिंग दिली आहे. त्यामुळे आता हा निर्देशांकही लॉन्ग टर्म अपट्रेन्डमध्ये आला आहे. गेल्या आठवड्यात डाऊ जोन्स ३३,७६० ला ओपन होऊन ३४,३४७ ला बंद झाला. म्हणजेच डाऊ जोन्समध्ये गेल्या आठवड्यात ५८७ अंकाची तेजी दिसून आली. जागतिक बाजाराच्या अपट्रेन्डमुळे भारतीय बाजारात परत एकदा तेजीची लाट आली आहे.

भारतीय शेअर बाजार गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यपूर्णतेने वधारत असल्याने अनेक समभाग सध्या तेजीमध्ये आहेत आणि खूप चांगला परतावा देत आहेत. यामध्ये पीएसयु म्हणजेच सरकारी मालकीच्या कंपन्यांचा समावेश आहे. रेल विकास निगम या समभागासाठी याच सदरामध्ये ४५ रुपयांना बाय करून ३७ च्या स्टॉप लॉससह ६० रुपयांचे टार्गेट दिले होते. या शेअरने आपले ६० चे टार्गेट यशस्वीरित्या पार करून ७३ च्या पातळीवर तो बंद झाला आहे. ४५ रुपयांच्या समभागात १५ ते २० दिवसांत २८ रुपयांची वाढ, ही खूप मोठी आहे. म्हणजेच तीन आठवड्यांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने ४५ हजार रुपये गुंतवून या कंपनीचे १००० समभाग खरेदी केले असते तर त्याला आज ७३ हजार रुपये मिळाले असते. तब्बल ६० टक्के परतावा या शेअरने १५ दिवसात मिळवून दिला आहे. याबरोबरच २१ नोव्हेंबरच्या लेखामध्ये पनामा पेट्रोलियम हा शेअर ३३० च्या भावाने ३०० चा स्टॉप लॉस लावून ५०० च्या टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. हा समभाग एका आठवड्यातच ४०० रुपयांच्या वर गेला आहे. म्हणजेच याही समभागाने अवघ्या एका आठवड्यात तब्बल २३ टक्के परतावा दिला आहे. योग्य वेळी योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली तर हमखास चांगला परतावा मिळू शकतो याचेच हे उदाहरण आहे.

१) राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर : ही एक सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन आणि त्यांची शेतक-यांपर्यंत विक्रीचे काम करते. सुफला बायोला ही लोकप्रिय आणि जास्तीत जास्त वापरली जाणारी खते आणि औषधे हीच कंपनी बनवते. या कंपनीच्या शेअरने २०१८ पासून ११२ ते २२ या मर्यादित पातळ्यांमध्ये काम केल्यानंतर या कंपनीच्या शेअरने मागच्या आठवड्यात ११२ च्या वर ११९ ला क्लोजिंग दिले आहे. या कंपनीचा शेअर जोपर्यंत ११२ च्या वर आहे तोपर्यंत १०० चा स्टॉप लॉस लावून १५० आणि २५० या टार्गेटसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करणे चांगले फायदेशीर ठरू शकेल. २. भारत हेवी इलेकट्रीकल्स लिमिटेड (भेल) : ही सुद्धा भारत सरकारच्या मालकची कंपनी आहे. ही कंपनी पॉवर प्लांटच्या उपकरणांच्या उत्पादनांचे काम करते. पॉवर, ऑइल, गॅस, आणि संरक्षण क्षेत्रासाठी विविध उत्पादने ही कंपनी बनवते. या कंपनीच्या शेअरने एप्रिल २०१९ पासून ८० ते २० या मर्यादित पातळ्यांमध्ये काम केल्यानंतर मागच्या आठवड्यात या कंपनीच्या समभागाने ८२ रुपयांच्या पातळीवर क्लोजिंग दिले आहे. या कंपनीचा शेअर जोपर्यंत ८२ च्या वर आहे तोपर्यंत ७० चा स्टॉप लॉस लावून १७० आणि ३५० या टार्गेटसाठी यामध्ये गुंतवणूक करणे चांगले फायदेशीर ठरू शकेल.

-रुचिर थत्ते,
शेअर बाजारतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या