27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home विशेष बदली

बदली

एकमत ऑनलाईन

‘हमारी इतनी बदलियों के बाद भी हम नहीं बदले,’ असे म्हणणारा अंग्रेजों के जमाने का जेलर आठवतोय? ‘भारत भ्रमण करने का इससे अच्छा तरीका और क्या हो सकता है,’ अशा शब्दांत वारंवार होणा-या बदल्यांवर टिप्पणी करणारा ‘सत्या’मधला पोलिस आयुक्त आठवतोय? पंधरा वर्षांत सोळा बदल्या झालेले बरेच पोलिस अधिकारी आपल्याला रूपेरी पडद्यावर आजवर दिसलेत. तरीसुद्धा ‘जिथं माझं पोस्टिंग ते माझं गाव,’ असे डायलॉग हे अधिकारी मारत असतात. सिनेमातले अधिकारी अत्यंत कर्तव्यतत्पर आणि कडक असतात आणि एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणाची उकल करताक्षणी त्यांच्या हातात बदलीची आॅर्डर पडते, हा ठरलेला सीन असतो.

बाजीराव सिंघमला ‘आपल्या एरियात’ आणण्यासाठी राजकीय क्षेत्रातलं वजन वापरणारा माफिया जयकांत आपण पाहिला आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यामुळे सक्तीच्या रजेवर जावे लागलेला एसीपी पृथ्वीराजसुद्धा पाहिला. तात्पर्य, पोलिस अधिकाºयांच्या बदल्या हा केवळ राजकारणी मंडळींच्याच नव्हे तर बॉलिवूडच्या दृष्टीनेही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. थंड पडलेल्या राजकारणाला अधिकाºयांच्या बदल्यांच्या विषयावरून उकळी फुटते. अधिकाºयांच्या बदल्या हा मीडियाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. या विषयात जनसामान्यांना फारशी रुची नसली, तरी कोणत्या अधिकाºयाची नियुक्ती कोठे होते, यावर बारकाईने लक्ष ठेवणारा, नव्या अधिकाºयांच्या स्वागताला हार-तुरे घेऊन जाणारा एक वर्ग सर्वत्र दिसतो.

‘महाआघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही,’ असे वारंवार सांगणाºया तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिकाºयांच्या बदल्या हा विषय मात्र तणावाचा ठरला. मुंबईतल्या दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरून केवढा गोंधळ उडाला, हे सर्वांनी पाहिले. नीरस, एकसुरी आणि बेचव झालेल्या राजकारणाला या विषयामुळे चरचरीत फोडणी मिळाली. काही बदल्यांना स्थगिती देण्याची वेळ ओढवली आणि त्याचीही खमंग चर्चा झाली. ‘आधी चर्चा; मगच बदल्या’ असे सूत्रही नुकतेच ठरल्याचे समजले. या निर्णयापूर्वी ‘इकडचे नगरसेवक तिकडे’ आणि ‘तिकडचे पदाधिकारी इकडे’ अशा कसरतींमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला होता. त्यात अधिका-यांच्या बदल्यांमुळे आणखी वाढ होऊ नये म्हणून शरद पवार रिंगणात उतरले. गृहमंत्र्यांना भेटले. त्यांना घेऊन ‘मातोश्री’वर गेले. या सगळ्या प्रवासाच्या ‘कळते-समजते’ बातम्या झळकल्या.

‘मातोश्री’वरच्या चर्चेत आणखी दोन-तीन मंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपद एका पक्षाकडे आणि गृहमंत्रिपद दुसºया पक्षाकडे असल्यावर एवढं चालायचंच! म्हणूनच बहुधा गृहमंत्रिपद दुस-या पक्षाकडे सोडाच; दुसºया व्यक्तीकडेही द्यायला सहजासहजी कुणी राजी नसते. असो! मुद्दा एवढाच, की बदल्या रद्द झाल्यामुळे नव्या नियुक्तीच्या ठिकाणी या अधिकाºयांना भेटायला हार-तुरे घेऊन जाऊ इच्छिणाºयांचे मनसुबे तूर्तास तरी लांबणीवर पडले आहेत.

बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे, हे नवतत्त्वज्ञान जोपासणा-या सध्याच्या जगात बदल आणि बदली या न बदलणाºया गोष्टी! बदल हा काहीजण ‘फायद्याचा’ म्हणून घडवतात तर बहुतांश लोक ‘अपरिहार्य’ म्हणून स्वीकारतात. बदल्यांचंसुद्धा गणित जवळजवळ तसंच आहे. काहींना ती फायद्याची वाटणार आणि अनेकांना अपरिहार्य वाटणार, हे ओघाने आलेच. बदल आणि बदल्या सुरूच राहणार. बदलणार नाही ते बदल्यांचं राजकारण! …आणि हो… ‘इतनी बदलियों के बाद’ न बदलणारी माणसं!

टिवल्या-बावल्या
सतीश जाधव

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...

जड झाले ‘ओझे’…

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुमारे पंचवीस टक्क्यांनी आकुंचन पावली. मार्च महिन्यात लागू केलेला कडक लॉकडाऊन हे याचे मुख्य कारण ठरले. अंदाजे तीन...

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी येथील ७ डिसेंबर २००४ रोजीची माझी मुलाखत अविस्मरणीय, वेगळे वळण देणारी ठरली. मुळातच किल्लारी गावची पहिलीच भेट कुतुहलाने, औत्सुक्याने भारावलेली...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

मुंबई पोलिस अन् महापालिकेची मान खाली

सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली मान खाली घालून घेतली. नंतर कंगना राणावत प्रकरण उद्भवले. सत्ताधारी पक्षाकडून धमक्या आणि खुद्द गृहमंत्री यांच्या...

कोनालाबी सोडना गेलाय

पार जगाचा वास उटलाय. किडे-मुंग्या मेल्यावानी लोकं मरूलालेत. नरसाळ्या कोनालाबी सोडना गेलाय. चिनमदून ईमानातून गेलाय म्हन त्यो समदीकडं. हिथं आमाला आनी ईमानात बसनं व्हैना...

कोरोना महामारी ‘देवाची करणी’, ‘आर्थिक महामारी’ कोणाची करणी?

‘देश रसातळाला गेला आहे’, असे विधान माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, ‘जलयुक्त शिवार योजना घोटाळा’फेम बोलबच्चन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी...

कांद्याचं रडगाणं

केंद्र सरकारने नुकतीच केलेली कांद्याची निर्यातबंदी ही चुकीच्या आकडेवारीनुसार करण्यात आली आहे. बाजारात कांद्याची दरवाढ सप्टेंबर महिन्यात दरवर्षी होत असते. ती उन्हाळी कांदा संपत...

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...