19.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

एकमत ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली. नाथाभाऊ हे भाजपमधील तसे वजनदार नेते. शिवसेनेशी २५ वर्षांची युती तोडून स्वबळावर वाटचाल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला, त्यात खडसेंचा मोठा वाटा होता आणि त्यांचे आडाखे बरोबर ठरल्याने पक्षातील त्यांचे वजन आणखी वाढले. खडसेंनी ज्या देवेंद्र फडणवीसांना ‘व्हिलन’ ठरवत राजीनामास्त्र उगारले आहे ते फडणवीस असोत किंवा सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे भाजपाच्या राज्यातील सत्ताकाळातील बिनीचे शिलेदार खडसेंच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे राजकारण करत आले आहेत.

कुटुंब, नोकरीप्रमाणेच राजकारणात वयाचे वा अनुभवाचे ज्येष्ठत्व आले की मानसन्मानांची अपेक्षा वाढत जाते. आपल्याला विचारूनच निर्णय घेतले जावेत अशी मनीषा बळावत जाते. असे वाटण्यात गैर काहीच नसते. पण यामुळे ‘मी’पणा वाढत गेला की छोट्या-छोट्या कारणांमुळे नाराजीनाट्य रंगण्यास सुरुवात होते. त्यातही ज्युनिअरांना आपल्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ लागले की नाराजी वाढत जाते. अस्वस्थता निर्माण होते. खडसेंबाबतही हेच घडले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा पक्षाचा निर्णय खडसेंना रुचलेला नव्हता. फडणवीसांच्या शपथविधीनंतर काही दिवसांनी पंढरपुरातील विश्रामगृहात झालेल्या वार्तालापादरम्यान खडसेंनी ही खदखद जाहीरपणाने मांडली होती.

बहुजनाचा मुख्यमंत्री झाला असता तर मला अधिक आनंद झाला असता, असे म्हणत त्यांनी आपण दुखावलो गेलो असल्याचे जाहीर प्रकटन केले होते.वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागपुरातील सभेतच फडणवीसांच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा केलेली होती. त्यामुळे पक्षाने सत्ता मिळाल्यानंतर खडसेंना डावलून फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली असे झाले नव्हते. परंतु तरीही आपल्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागल्याने नाथाभाऊंचा सात्विक संताप झाला होता. या संतापाची झालर मंत्रालयातील बैठकांमध्येही अनेकदा दिसून आली होती. बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत खडसेंनी धाव घेतली होती. मी पक्षासाठी ४० वर्षे घालवली आहेत, पक्षाला यश मिळण्यात माझा सिंहाचा वाटा आहे, मी अनुभवी आहे हा त्यांचा बाणा सतत दिसून येत होता. नाराजी दूर करण्यासाठी नाथाभाऊंकडे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क अशी महत्त्वाची सहा ते सात खाती देण्यात आली होती. पण त्यांवर त्यांचे समाधान झालेले नव्हते.

कोरोना काळातही ८७ वर्षांच्या योध्द्या डॉक्टरची अनवाणी सेवा

पुढे साधारण वर्षभरात फटाक्यांची लड लागावी तसे एकापाठोपाठ एक आरोप खडसेंवर झाले होते. आरोप करणारे विरोधक असले, तरी पक्षातून खडसेंना मिळणारा पाठिंबा हळूहळू ओसरत असल्याचे उत्तरोत्तर दिसून येऊ लागले. विधिमंडळात फडणवीसांनी खडसेंची पाठराखण केली होती; परंतु विषय चिघळत चालला, तेव्हा ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही भेटले होते. नेतृत्वाने खडसेंबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आधी मुख्यमंत्र्यांना देऊ केले; पण फडणवीसांनी खडसेंविषयी एक अहवाल तयार करून केंद्रीय नेतृत्वाला पाठविला. गढूळ वातावरणातच मुख्यमंत्र्यांची खडसेंबरोबर चर्चा झाली होती. परंतु राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका समोर ठाकल्या असताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले होते.

या निवडणुका बिनविरोध झाल्यावर लगेच खडसेंची गच्छंती झाली. लाल दिवा नाकारून खडसेंनी जळगावात घडवून आणलेले शक्तिप्रदर्शन त्यांच्या कामी आले नाही. नंतरच्या काळात बहुतांश आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील खडसेंना डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली. दिवसेंदिवस तो वाढत गेला. खडसे पक्ष सोडणार हे स्पष्ट होऊनही त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न झाले नाहीत. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बाहेरचा रस्ता धरला.

खडसेंच्या बाबतीत जे घडले, त्याची पायाभरणी स्वत: खडसेंनीच केली होती. त्यांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात घराणेशाही तयार केली होती. लोकसभेची उमेदवारी खडसेंनी आपल्या सूनबाईंना द्यायला भाग पाडल्याने हरिभाऊ जावळे यांची नाराजी पक्षाने ओढवून घेतली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद त्यांनी पत्नीला दिले; शिवाय महानंदचे संचालकपदही दिले. एका मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. दुस-याही मुलीला विधान परिषदेवर पाठविण्याची तयारी सुरू केली होती. हा त्यांचा प्रवास पक्षाला नक्कीच मानवणारा नव्हता. विरोधकांवर घराणेशाहीचे आरोप करणा-या भाजपमध्येच जळगावचे संस्थान खडसेंनी अशा प्रकारे ‘विकसित’ करणे अनेकांच्या डोळ्यावर आले आणि त्यांची उलटगणती सुरू झाली.

रॉ चीफ भेटीनंतर नेपाळ पंतप्रधान ओली वादाच्या भोव-यात

त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात गिरीश महाजनांसारखा पर्याय तयार करण्याची खेळी भाजपकडून खेळली गेली. मागील पाच वर्षांत महाजनांचे वाढते वजन, राज्याच्या राजकारणातील त्यांची वाढती प्रतिष्ठा याचे शल्य खडसेंच्या मनात असणे स्वाभाविक होते. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अशा प्रकारचे शल्य बाळगणारी आणि त्या शल्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देणारी अनेक नेतेमंडळी आहेत. अगदी शरद पवारांपासून राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, उदयनराजे भोसले अशी अनेक तालेवार नावे सांगता येतील. या यादीत आता खडसे सामील झाले आहेत. खडसेंचा हा प्रवास नारायण राणेंच्या वाटचालीशी साधर्म्य राखणारा आहे.

राणेंनीही आपल्या वाढत्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता न झाल्याने शिवसेना आणि काँग्रेसवर प्रहार करत या पक्षांतून एक्झिट घेतली. पण शिवसेनेतून राणे बाहेर पडले तेव्हाचा त्यांचा रुबाब हळूहळू कसा ओसरत गेला हे राज्याने पाहिले आहे. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथेही मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याची मनीषा होती. पण सत्तेच्या राजकारणात मुरलेल्या काँग्रेसच्या मुरब्बींनी राणेंना कशा प्रकारे झुलवत ठेवत पक्षत्याग करण्यास भाग पाडले हे सर्वांनीच पाहिले आहे. अखेरीस त्यांना भाजपाने आधार दिला. भाजपवासी होईपर्यंत राणेंचे राजकीय वजन घटत गेले होते. त्यामुळे आजही भाजपा राणेंचा वापर शिवसेनेला ‘लक्ष्य’ करण्यापुरताच करताना दिसते. तोच प्रकार आता खडसेंबाबत घडण्याची शक्यता आहे.

खडसेंनी आता हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे मनोबल वाढणे स्वाभाविक आहे. कारण आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना व अन्य पक्ष राज्यातील मोठ्या संख्येचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष सत्तेत असतानाही भाजपा विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडले आहे. फडणवीसांच्या कार्यपद्धतीविषयी कितीही टीका होत असली तरी त्यांच्यातील अभ्यासूपणाबाबत कोणाचेही दुमत नाही. या अभ्यासूपणाच्या जोरावरच फडणवीसांनी गेल्या वर्षभरात कोरोना महामारी, अतिवृष्टीचे संकट आदी मुद्यांवरून सरकारची नाकेबंदी करण्यात, जनमानसात सरकारमधील विसंवाद, निर्णयक्षमतेचा अभाव ठसवण्यात यश मिळवले आहे हे नाकारता येणार नाही.

कोरोना संसर्गाचा विळखा सैल

त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सर्वच नेते फडणवीसांना टार्गेट करण्यासाठीची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता खडसेंच्या रूपाने त्यांना फडणवीसांचा काऊंटरवेट मिळाला आहे. खडसे हे सुरुवातीपासूनच फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. विरोधी पक्षनेते असताना त्यांची सभागृहातील कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. किंबहुना, फडणवीस सरकारच्या काळातही त्यांनी आपल्याच सरकारच्या निर्णयांवर टीका केलेली होती. हा आक्रमकपणा आणि उपद्रवमूल्य विचारात घेऊनच त्यांना राष्ट्रवादीने आपल्या गोटात घेतले आहे. खडसेंच्या नथीतून आता भाजपामध्ये बहुजनांवर कसा अन्याय केला जातो, उच्चवर्णियांचे वर्चस्व कसे वाढले आहे, असे तीर आता आगामी काळात मारले जातील.

त्यातून फडणवीसांना आणि भाजपाला घायाळ करण्याचा प्रयत्न होईल. यातून महाविकास आघाडीला किती फायदा होतो हे येणारा काळ सांगेलच. पण मुख्य मुद्दा आहे तो खडसेंच्या पदरी काय पडणार? खडसेंना पक्षात घेताना एखाद्या मंत्रिपदाचे गाजर दाखवले असणे स्वाभाविक आहे. त्याची पूर्तता कधी होते हे पहावे लागेल. अन्यथा आजच्यापेक्षा वेगळी स्थिती खडसेंची असेल असे वाटत नाही. खडसेंसोबत भाजपातील एकही आमदार पक्षाला सोडून गेलेला नाही. महाविकास आघाडीबाबत जनमत काय आहे, याचे मूल्यमापन करणा-या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच मोदींचा करिष्मा आजही कायम राहील असे बिहारच्या निवडणूक अंदाजांवरून दिसत आहे. त्यामुळे खडसेंच्या जाण्याने भाजपला ओहोटी लागण्याच्या शक्यता आजमितीला तरी दिसत नाहीत.

असे असले तरी खडसेंसारख्या नेत्याच्या जाण्याबद्दल भाजपने आत्मचिंतन करायला हवे हे निर्विवाद सत्य आहे. पक्षासाठी खरोखरीच खस्ता खाणा-या जुन्या नेत्यांमध्ये खडसेंचे स्थान वरचढ होते. शेठजी-भटजींचा पक्ष अशी भाजपाची प्रतिमा बदलण्यात ज्या नेत्यांचा वाटा राहिला त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंबरोबरच नाथाभाऊंचेही योगदान राहिले आहे. अशा नेत्याची पक्षाने ज्यापद्धतीने कोंडी केली ती कोणाही सहृदय व्यक्तीला न पटणारी आहे. मोदींनी ज्याप्रमाणे अडवाणींची ‘समृद्ध अडगळ’ बनवून टाकली तसाच प्रकार खडसेंबाबतही झाला. गोपीनाथ मुंडेंबाबतही हे घडले होते. ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणा-या पक्षाला हे अशोभनीय आहे.

अखेरपर्यंत खडसे पोटतिडकीने पक्षाकडे आर्जव करत राहिलेले असताना त्यांना केवळ बसूया, बोलूया म्हणत ज्यापद्धतीने तोंडाला पाने पुसण्यात आली, त्यातून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश गेला असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुद्दा भ्रष्टाचाराचाच असेल तर ज्या अजित पवारांवर फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्यांच्यासोबत थेट सरकार बनवण्यास ते राजी झाले होते, हे विसरून चालणार नाही. कर्नाटकात येडियुरप्पांसारख्या नेत्याचे पुनर्वसन करून त्यांना मुख्यमंत्री बनवले गेलेलेही देशाने पाहिले. मग त्यांच्याएवढी ‘ताकद’ खडसेंकडे नव्हती हा त्यांचा गुन्हा ठरला का? असे अनेक प्रश्न आता पक्षातून आणि जनतेतून विचारले जातील.

प्रा. पोपट नाईकनवरे
राज्यशास्त्र अभ्यासक

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...