22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home विशेष टीआरपी

टीआरपी

एकमत ऑनलाईन

‘जग कशावर चालतं,’ या प्रश्नाला ‘अन्नावर’ हे विश्वव्यापी उत्तर असलं, तरी आजकाल तसं कुणी म्हणत नाही आणि मान्यही करत नाही. कारण भूक विश्वव्यापी असली, तरी जो मुद्दा अजिबात चर्चेतच नाही, तो अस्तित्वात कसा असेल अशी आपली आपल्यालाच शंका येते. मग सगळेच म्हणतात म्हणून आपल्यालाही म्हणावं लागतं की, जग टीआरपी आणि ट्रेन्डिंग हॅशटॅगवर चालतं. एखादा चेहरा, एखादं वक्तव्य, एखादं लफडं सतत चर्चेत असतं म्हणून वातावरण मोकळं राहतं आणि आपण श्वास घेऊ शकतो.

हे फक्त आपल्याच शहरात किंवा आपल्याच देशात घडतंय असं कुणाला वाटत असेल, तर ती अंधश्रद्धाच होय. थोड्याफार फरकानं माणूस इथून-तिथून सारखाच! आपल्याकडे कंगना राणौत (आडनाव बरोबर लिहिलंय का? छे बुवा, चर्चेतलं नावही नीट लिहिता-वाचता येऊ नये? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं छापून येतंय.) सध्या अशा जागी विराजमान आहे, जिथं काही दिवसांपूर्वीच सोनू सूद होता. परंतु गेल्या काही वर्षांत जगभरात घडलेल्या घडामोडींचा बारकाईनं अभ्यास केला तर असं लक्षात येईल, की कोणतातरी एक चेहरा सर्वांनाच समोर हवा असतो.

काही चेहरे एकदाच गाजून गायब होतात. काही चेहरे थोड्या-थोड्या दिवसांनी पुन:पुन्हा गाजतात तर काही चेहरे सतत लोकांसमोर राहतात. ‘साइड रोल’ करणारे येतात-जातात; पण हे चेहरे पडद्यावर कायम राहतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे सतत चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व. आता तर अमेरिकेची निवडणूक जवळ आलीये; त्यामुळं ट्रम्पसाहेब काय बोलतील आणि कसे चर्चेत राहतील, हे सांगता येणार नाही. प्राप्त माहितीनुसार, ट्रम्प यांच्या १८ मुलाखतींवर आधारित ‘रेज’ हे पुस्तक सध्या बरंच चर्चेत आहे. शोधपत्रकार बॉब वुडवर्ड यांनी घेतलेल्या ट्रम्प यांच्या या मुलाखती ‘अराजकीय’ नसाव्यात, कारण उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा उल्लेख एका मुलाखतीत असून तो सध्या सर्वाधिक चर्चेत (ट्रेन्डिंंग) आहे.

आपण हुकूमशहा कसे झालो, आपल्या विरोधातल्या नातेवाइकांना आपण कसं मारलं, हे किम जोंग उन यानं आपल्याला २०१८ मध्ये सिंगापूर भेटीत सांगितलं होतं, असा दावा ट्रम्प यांनी केलाय. हे वाचलं आणि कंगना वगैरे विषय डोक्यातून उडूनच गेले राव! किम जोंग हा आपल्याकडे हंगामी टीआरपी घेणारा मोहरा. ‘कुत्री पाळू नका; मारून खा,’ असं देशवासीयांना सांगणा-या किमबद्दल कालच आणखी एक भयानक बातमी आलीय. उत्तर कोरियातले पाच अधिकारी म्हणे कुठल्यातरी पार्टीत जेवायला गेले होते. तिथं त्यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि किमच्या निर्णयांवर टीका केली म्हणून त्यांना गोळ्या घातल्या. पार्टीत अधिका-यांची जीभ घसरल्याचं किमला कसं कळलं, हा खरा धक्कादायक प्रश्न!

देश उजव्या विचारांचा असो वा डाव्या, तिथं लोकशाही असो वा हुकूमशाही, असे ‘हेर’ सगळीकडे असतातच. पण अधिका-यांना मारण्याचा निर्णय झटपट घेणा-या एका हुकूमशहाने शत्रुराष्ट्राच्या प्रमुखाला आपण मारलेल्या माणसांच्या कहाण्या कशासाठी ऐकवल्या असतील? हा त्याहून अस्वस्थ करणारा प्रश्न! याला म्हणतात डोक्याला खुराक! नाहीतर आपल्याकडचे सर्वपक्षीय नेते! अजून रामायण, महाभारतातलंच बोलतायत. एखाद्या दिवशी टीआरपी गमावतील तेव्हा कळेल
-अपर्णा देवकर

ताज्या बातम्या

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

आणखीन बातम्या

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...