Tuesday, September 26, 2023

बारा ज्योतिर्लिंगे

श्रावण महिन्याचा आज दुसरा सोमवार असल्याने राज्यभरातल्या शिवमंदिरांत पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषत: देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. औरंगाबादमधील घृष्णेश्वर, परळीतील वैजनाथ, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यातले भीमाशंकर, औंढा नागनाथ अशी ज्योतिर्लिंगे आहेत. त्यामुळे राज्यभरात ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांत शिवभक्तांच्या रांगा लागलेल्या असतात.

४. ओंकारेश्वर (मध्य प्रदेश – ओंकारेश्वर)
श्री ओंकारेश्वर ममलेश्वर हे चौथे ज्योतिर्लिंग. येथे नर्मदा नदीस ओंकाराचा आकार आहे, म्हणून याला ओंकारेश्वर असेही म्हणतात. ‘श्री ओंकारेश्वर ममलेश्वर’ हे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मन्धाता ओंकारेश्वर बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ओंकारेश्वरची निर्मिती नर्मदा नदीपासून झाली आहे. येथे एकूण ६८ तीर्थे आहेत. येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनपासून दहा मैलांवर नर्मदेच्या काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार ममलेश्वर असे म्हणतात. हे पवित्र ठिकाण देखील मध्य प्रदेश राज्यात येत असून मुंबईपासून ८३० कि. मी., उज्जैन १४० कि. मी., इंदोर ८० कि.मी., खंडवापासून ७० कि.मी. अंतरावर आहे.

एकदा विंध्य पर्वताला फार गर्व झाला. नारदमुनीला विंध्य म्हणाला, ‘माझ्याइतका मोठा जगात कोणीच नाही. खरे आहे की नाही?’ तेव्हा नारदमुनी हसून म्हणाले, ‘नाही, तुझ्यापेक्षा हिमालय श्रेष्ठ आहे. सगळे देव त्याला मान देतात.’ हे एकून विंध्याला दु:ख झाले. मग त्याने सहा महिने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ओंकाररूपात शंकर प्रकट झाले. ते म्हणाले, ‘विंध्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग.’ या वरदानामुळे विंध्य पर्वताला आनंद झाला. आनंदित झालेले देव व ऋषी या सर्वांनी शंकराची पूजा केली. मग ते सर्वजण हात जोडून म्हणाले,‘भगवान महादेवा, सर्व लोकांच्या कल्याणासाठी तू येथेच कायमचा रहा.’ तेव्हा शंकर म्हणाले,‘तथास्तु!’ आणि शंकर गुप्त झाले तेथे दोन शिवलिंग प्रकट झाली.

Read More  अयोध्येत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी

एका लिंगात शंकराने ओंकारेश्वर नावाने प्रवेश केला व दुस-या लिंगात अमरेश्वर किंवा अमलेश्वर या नावाने प्रवेश केला. अशी ही ओंकार व अमलेश्वर दोन ज्योतिर्लिंगे निर्माण झाली. ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच येत असत. दारीयाइ नावाच्या महान पुरुषाने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. यानंतर या ठिकाणी उत्सव होऊ लागले. इ. स. ११९५ मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला. यानंतर मात्र मराठ्यांच्या कारकीर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. त्यांच्या काळातच कोटी लिंगार्चन प्रथा सुरू झाली.

५. वैजनाथ (महाराष्ट्र – परळी)
श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील परळी या ठिकाणी असून ते पाचवे ज्योतिर्लिंग आहे. इथे शिवशंकर पार्वतीसह निवास करतात. म्हणून या तीर्थक्षेत्राला ‘काशी’ असे म्हटले जाते. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यापैकी धन्वंतरी वैद्यराज आणि अमृत ही दोन रत्ने होती. अमृत पिण्यासाठी राक्षस धावले तेव्हा श्री भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला श्री शंकराच्या पिंडीत गुप्त केले. त्यामुळे या शिवलिंगाला अमृतेश्वर किंवा वैजनाथ म्हटले जाते. राक्षसलोक या पिंडीला स्पर्श करू लागताच या पिंडीतून ज्योतिर्मय ज्वाला निघू लागल्या त्यामुळे राक्षस पळून गेले. शिवभक्ताने स्पर्श करू लागताच अमृत धारा निघू लागल्या.

आजही या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून घेण्याची प्रथा आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पाय-या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे.

Read More  आयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी

परळी वैजनाथ हे पवित्र ठिकाण महाराष्ट्र राज्यात असून बीड जिल्ह्यात आहे. येथे जाण्यासाठी खासगी बसेस, रेल्वे उपलब्ध आहेत. मुंबईपासून हे ठिकाण ५०० कि. मी., पुणे ६७५ कि. मी., नाशिक ३६१ कि. मी., औरंगाबाद २३०, बीड १००, अंबाजोगाईपासून फक्त २६ कि. मी. अंतरावर आहे. परभणी स्टेशनपासून ६१ कि. मी. अंतरावर दक्षिणेस आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई तालुक्यात आहे. लोकसंख्या ३१,०७८ (१९७१). वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकारणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो.

पुढे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला (१७८३), असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी सोमवारपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समितीने यावर्षी भाविकांसाठी तीन दर्शन रांगा केल्या होत्या. दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आला होता.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
मोहेकर महाविद्यालय, कळंब
मोबा. ९४२३३ ४२२२९

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या