24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषकोव्हॅक्सिनमध्ये वासराच्या रक्तद्रव्याचा वापर ?

कोव्हॅक्सिनमध्ये वासराच्या रक्तद्रव्याचा वापर ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी कोव्हॅक्सिन लसीच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला. त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती ट्विटरवर शेअर करत सांगितले की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीमध्ये गायीच्या नवजात वासराच्या रक्तद्रवाचा वापर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती शेअर केली आहे. ही माहिती केंद्रीय औषध नियंत्रक मंडळाने विकास पटनी या व्यक्तीला दिलेली आहे. विकास पटनी यांनीच ही माहिती मागवली होती. गौरव पंधी म्हणतात, ही माहिती देताना मोदी सरकारने हे कबूल केले आहे की कोव्हॅक्सिनमध्ये गायीच्या नवजात वासराचे रक्तद्रव वापरले आहे.

हे रक्तद्रव २० दिवसांच्या वासराला मारुन त्याच्या गोठलेल्या रक्तातून मिळवलेले आहे. ही माहिती सार्वजनिक व्हायलाच हवी. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा प्रकारे वासराच्या रक्तद्रवाच्या वापराबद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, कोव्हॅक्सिनमध्ये थोड्या प्रमाणातही वासराचे रक्तद्रव वापरण्यात आलेले नसल्याचा खुलासा केला आहे.

चुकीचा समज पसरवण्याचे काम : आरोग्य मंत्रालय
तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दलचे पत्रक काढत सांगितले आहे की, अशा प्रकारचा चुकीचा समज पसरवण्याचे काम या सोशल मीडिया पोस्टमधून होत आहे. त्याचप्रमाणे या आशयाच्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये तथ्यांसोबत छेडछाड करण्यात आलेली आहे.

वासराची कत्तल नाही : रघुनाथन
दुसºया ट्विटमध्ये गौरव यांनी कशाप्रकारे हे रक्तद्रव वेगळे करण्यात आले याबद्दलची माहिती दिली आहे. तर याबद्दल जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक आनंद रघुनाथन यांनी या ट्विटला उत्तर देताना लिहिले आहे, हे ट्विट डिलीट करा. पहिली गोष्ट म्हणजे कोव्हॅक्सिन ही लस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आरोप करताय तसे वासराचे रक्तद्रव नाही. दुसरे या लसीच्या निर्मितीसाठी वारसांची कत्तल करण्यात आली नाही. अशा प्रकारचे वासराचे रक्तद्रव फक्त विषाणूच्या अधिक पेशी निर्माण करण्यासाठीच वापरण्यात येते आणि ही माहिती २०२० पासून सार्वजनिकच आहे.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोजक्याच रुग्णांवर उपचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या