27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home विशेष क्रांतीचा वणवा

क्रांतीचा वणवा

एकमत ऑनलाईन

हैदराबाद मुक्तिसंग्राम अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने-रक्ताने लिहिला गेला आहे. अबाल-वृद्ध महिला, तरुण या सर्वांनी स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जो-तो स्वत:चे प्राण अर्पण करायला समोर येत होता. सा-या निजाम राजवटीत क्रांतीचा वणवा पसरला होता. निजामशाहीतील प्रत्येकजण देशासाठी काहीही करायला सिध्द झाला होता. हैदराबाद संस्थानातील अनेक खेड्यांपर्यंत या क्रांतीचे लोण पसरले होते.

नाईचाकूर येथे स्वातंत्र्याच्या विचाराने भारावलेली माणसं होती. नेहमी स्वातंत्र्याची खलबतं व्हायची. यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी आर्य समाजाचे प्रमुख श्यामलालजी, सदाविजय आर्य यांच्या धाडसी कृत्यांमुळे भारावून गेलेले युवक या स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने सहभागी होऊ लागले. यामध्ये राम बापू पवार, माणिक कारभारी, बळिराम कारभारी आदी ज्येष्ठ मंडळींचा सहभाग होता.

याच वेळी गोविंदराव पवार, शाहूराज जाधव हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासात राहून आले होते. गावातील ५०-६० युवकांना स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यासाठी नाभिराज जमालपुरे यांच्या घरी एकत्र आणले. निजाम पोलिसांना न घाबरता आपला वाडा (घर) स्वातंत्र्यसैनिकांना सदैव मोकळा केला. बैठक सुरू झाली आणि पहिले क्रांतीचे पाऊल उचलण्यासाठी योजना तयार केली गेली.

दुकानात पाणी शिरल्याने व्यापा-यांचे लाखोंचे नुकसान

शिंदीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. शिंदीपासून सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न होत होते. निजामविरोधी आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे शिंदीची झाडे तोडून टाकणे..वेळप्रसंगी जाळणे अशी सरकारला त्रासदायक कृत्ये सतत केली जात होती. १९४६ साली हे जनआंदोलन निजाम राजवटीत सर्वत्र चालू झाले होते.
संस्थानात शिंदीच्या झाडांपासून मद्य तयार केले जात होते. हे सरकारी उत्पन्नाचे मोठे साधन होते. शेतक-यांच्या खाजगी शेतात असलेली झाडेसुध्दा सरकारचे लोक घेत होते.

१९४७ साली हैदराबाद संस्थानात सर्वत्र जंगल सत्याग्रह करण्यात आला. मोठ्या संख्येने विविध ठिकाणी सत्याग्रह झाले. याच कालावधीत साता-याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेचे नाईचाकूर येथे आयोजन करण्यात आले होते. ही सभा नाईचाकूर येथील नाभिराज जमालपुरे यांच्या शेतातील आंबराईत झाली. या सभेनंतर गावातील युवकांना स्वातंत्र्याचे स्फुरण अधिक झाले. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित ठरवण्यात आली. काही दिवसांत गावातील युवकांनी हे शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रुपयांचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. यासोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केली, दारूच्या भट्ट्या पाडून टाकण्यात आल्या. पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला.

निजाम पोलिस क्रांतिकारकांच्या शोधात होते. हे कृत्य कोणी केले हे त्यांना समजत नव्हते म्हणून गावातील फितुरांना हाताशी घेऊन नावे काढण्यात येत होती. यामध्ये सहभागी असलेले युवक सीमावर्ती भागात असलेल्या वागदरी कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. यातील तिघे जण गावातील फितुरीमुळे निजाम पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये राम बापू पवार, गिरजाप्पा काळे, धोंडिबा वडर हे होते. यांना सीमावर्ती भागातील नळदुर्ग येथील जेलमध्ये कैद केले. ५ महिने जेलमध्ये होते. या कालावधीत त्यांनी पोलिसांशी चांगले संबंध निर्माण केले. पोलिसांसोबत मैत्रीने राहून विश्वास संपादन केला.

खामसावडीच्या तरुणाने कोरोनात यशस्वी ड्रॅगन शेती फुलवली

जेलमध्ये दिलेले अंथरूण-पांघरूणापासून राम पवार यांनी गोफण (पाखरे राखायची) विणून तयार केले. ती सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. दररोजप्रमाणे प्रात:र्विधीला जेलच्या बाहेर घेऊन जात होते. त्यावेळी तयार केलेली गोफण कंबरेला व्यवस्थित गुंडाळून सोबत घेतली. पोलिसांशी गप्पा मारत-मारत जेलपासून जवळच असलेल्या बुरुजाच्या जवळ गेले. पोलिसांनी विश्वासाने प्रात:र्विधीसाठी जाण्यास सांगितले. पोलिस तेथून दूर उभे होते. या संधीचा उपयोग करून राम पवारांनी बुरुजावरून पलायन केले. हातातील तांब्या खाली पडल्यामुळे पोलिस सावध झाले आणि पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांशी गोफणीच्या साहाय्याने कडवी झुंज देऊन २ पोलिसांचा खात्मा करून वागदरी कॅम्पमध्ये भूमिगत झाले. काही काळाने पेठसांगवीला नातेवाईकाकडे राहू लागले.

यासोबत राष्ट्रीय विचारांची शाळा सुरू केली. किसान दल संघटन, वंदे मातरम् आंदोलन, जंगल सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान, झेंडा आंदोलन अशा अनेक आंदोलनांत नाईचाकूर येथील व्यंकट जयवंता पवार, माणिक (कारभारी) देवराव पवार, तुळशीराम साळुंके (व्हगाडी), सुग्रीव (दादा) हणमंत पवार, कॅप्टन नामदेव पवार, जयपाल आदप्पा काक्रंबे, सदानंद सनातन, माणिक पवार, शंकर लंकडे, कॉ. हिरा पवार, नामदेव पवार, सोपान माने, महादा सनातन, शाहुराज जाधव, गोविंद पवार, किसन तुकाराम पवार, नागनाथ पवार, नाभीराज जमालपुरे, माणिकराव पवार, बाबुसिंह पवार, शंकर सनातन, तुळशीराम काळे, बाबाराव भोसले, किसन महादेव पवार, व्यंकट भाई माने, किसन तात्याराव पवार, व्यंकट गोपाळ पवार, राम बापू पवार, मनोहरसिंह पवार, माणिक सगर, बाबू पांडुरंग इटुबोने, तुकाराम इटुबोने, रंगराव कदम, दिगंबर कुलकर्णी, पांडुरंग बाबळसुरे, तुळशीराम साळुंके आदी क्रांतिकारकांनी या लढ्यात नेतृत्व करून मोलाचे योगदान दिले.

दत्ता केशवराव माने
नाईचाकूर, ता. उमरगा

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...

जड झाले ‘ओझे’…

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुमारे पंचवीस टक्क्यांनी आकुंचन पावली. मार्च महिन्यात लागू केलेला कडक लॉकडाऊन हे याचे मुख्य कारण ठरले. अंदाजे तीन...

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी येथील ७ डिसेंबर २००४ रोजीची माझी मुलाखत अविस्मरणीय, वेगळे वळण देणारी ठरली. मुळातच किल्लारी गावची पहिलीच भेट कुतुहलाने, औत्सुक्याने भारावलेली...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

मुंबई पोलिस अन् महापालिकेची मान खाली

सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली मान खाली घालून घेतली. नंतर कंगना राणावत प्रकरण उद्भवले. सत्ताधारी पक्षाकडून धमक्या आणि खुद्द गृहमंत्री यांच्या...

कोनालाबी सोडना गेलाय

पार जगाचा वास उटलाय. किडे-मुंग्या मेल्यावानी लोकं मरूलालेत. नरसाळ्या कोनालाबी सोडना गेलाय. चिनमदून ईमानातून गेलाय म्हन त्यो समदीकडं. हिथं आमाला आनी ईमानात बसनं व्हैना...

कोरोना महामारी ‘देवाची करणी’, ‘आर्थिक महामारी’ कोणाची करणी?

‘देश रसातळाला गेला आहे’, असे विधान माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, ‘जलयुक्त शिवार योजना घोटाळा’फेम बोलबच्चन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी...

कांद्याचं रडगाणं

केंद्र सरकारने नुकतीच केलेली कांद्याची निर्यातबंदी ही चुकीच्या आकडेवारीनुसार करण्यात आली आहे. बाजारात कांद्याची दरवाढ सप्टेंबर महिन्यात दरवर्षी होत असते. ती उन्हाळी कांदा संपत...

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...