26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषवटसावित्री पौर्णिमा - झाडे जपण्याचे व्रत

वटसावित्री पौर्णिमा – झाडे जपण्याचे व्रत

एकमत ऑनलाईन

ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात झालेली असते. सर्वत्र हिरवळ वाढू लागते. सृष्टी नवचैतन्याने सजते. त्याचा आनंद झाडं आपली कोवळी पाने हलवून साजरा करत असतात. सणासुदीचे दिवस सुरू होतात. ज्येष्ठ हा सर्वांत मोठा. महिन्यांतही मोठा, दिवसांतही मोठा. कारण ज्येष्ठ महिन्यातच अयनदिन येतो. अर्थात तो इंग्रजी तारखेनुसार २१ किंवा २२ जून रोजी येतो. म्हणजे या दिवशी दक्षिणायन सुरू होते. अर्थात सूर्य जरा जरा दक्षिण दिशेला झुकू लागतो. आपण नेहमी उगवत्या सूर्याची दिशा पूर्व म्हणतो परंतु तो कधी स्थिर नसतो. तो काही दिवस उत्तरेच्या दिशेने तर काही दिवस दक्षिणेच्या दिशेने क्षितिजावर येत असतो व आसमंतात फिरून परत सायंकाळी त्याच दिशेला मावळत असतो. त्या त्या ऋतूंत आणि मोसमात सूर्याचे भ्रमण वेगवेगळ्या कक्षेत होत असते. आपल्याकडे त्याला राशिभ्रमण ही संज्ञा आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटसावित्री पौर्णिमा या नावानेही ओळखली जाते. या पौर्णिमेची आख्यायिका सर्वश्रुत आहे. सत्यवान या एका राजाच्या मुलाबरोबर सावित्री नावाच्या राजकन्येचा विवाह तिच्या मर्जीने होतो. त्याचे आयुष्य कमी आहे, हे माहीत झाल्यानंतरदेखील तिचा लग्नाचा निर्धार कायम राहिला होता. लग्नानंतर त्या राजावर संकट कोसळते. तिच्या सासरचे वैभव नष्ट होते. राज्य जाते. त्यामुळे उपजीविकेसाठी सावित्री सत्यवानासह जंगलात राहायला जाते. एके दिवशी (तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता.) लाकूड तोडता तोडता घनदाट जंगलात ते रस्ता विसरतात. तेव्हा एका मोठ्या वटवृक्षाखाली विश्रांती घेतात. तोवर सूर्यास्त झालेला असतो आणि त्यांना त्या झाडाखालीच झोपण्याची वेळ येते. मात्र घनदाट जंगल आणि सर्वत्र झाडेच झाडे. सत्यवानाचा श्वसन विकार बळावतो. त्यातच भोवताली झाडे तशातच रात्र झालेली.

रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडतात, हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यातच सत्यवान कोमात जातो. त्याचवेळी त्याची जीवनसीमा संपल्याने प्रत्यक्ष यमराजच त्याचे प्राण हरण करण्यासाठी तेथे येतात आणि सावित्री यमराजाकडे सत्यवानाचे प्राण परत मागते, अशी ही कथा. मात्र सावित्री आपला हट्ट सोडत नाही, ती यमाच्या पाठोपाठ जाते. तिची जिद्द व चिकाटी पाहून यमराज तिला तीन वर मागण्यास सांगतो. पहिल्या वराने ती सासू सास-यांचे अंधत्व जाऊन त्यांना नवीन दृष्टी मागते. यमराज ते वरदान देतो. दुस-या वराने ती आपल्या सास-याचे राज्य परत मागते. यातील पहिल्या वरदानामध्ये विज्ञानाचा संदर्भ देता येईल. सावित्रीने सासू-सास-याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली व नवीन लेन्सद्वारे त्यांची दृष्टी परत आणली असे म्हणता येईल. दुस-या वराने त्यांचे राज्य परत मिळावे अशी कामना ती करते.

एसटीच्या लांब पल्ल्यांच्या गाड्याचे मिळणार ऑनलाईन रिझर्व्हेशन

ज्या शत्रू पक्षाशी संधान बांधलेल्या काही मंत्र्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी आपल्या राजाची दृष्टी परत आल्याचे कळाल्यावर शिक्षेच्या भीतीने शत्रूपक्षातून स्वगृही कोलांटी मारली व शत्रूराजाचा पराभव सत्यवानाच्या सैन्याने केला असा मतितार्थ या दुस-या वरदानाद्वारे निघतो. सत्यवान बेशुद्ध पडलेला असतो. सत्यवानाच्या प्राणाची भीक सावित्री मागते. यमराजाच्या मागे जात राहते. याचा अर्थ सत्यवानाला तज्ज्ञ वैद्याकडे घेऊन जाते. सावित्रीची जिद्द व चिकाटी पाहून यमराजाला दया येते. यमराजाच्या पाठीमागे ती सत्यवानाच्या निपचीत पडलेल्या देहाला घेऊन जात असते. हे तिघे घनदाट अरण्यातून बाहेर येतात. पहाट होत आलेली असते. झुंजूमुंजू होत आल्याने तेथे मोकळी हवा असते. भरपूर ऑक्सिजनयुक्त हवा खेळत असते. वातावरण प्रसन्न झालेले असते. यमराजाला ती आशीर्वाद मागत असते. परंतु यमराज सत्यवानाचे प्राण परत द्यायला तयार नसतो. तेव्हा तिस-या वरदानाने ती आपल्या सासू-सास-याला नातवंडं-पतवंडांचे सुख मिळावे असा आशीर्वाद मिळवते. सावित्रीचा वंश वाढायचा असेल तर त्यासाठी सत्यवान जिवंत व्हायलाच हवा, असे ती यमराजाला पटवून देते.

अथक प्रयत्नांनंतर सत्यवान कोमातून बाहेर येतो व सावित्रीला पाहून तो खुश होतो. आपण इतका वेळ निचेष्ट कसे पडलो. यमराज हा धन्वंतरीचा मित्रच असल्याने सत्यवानाची श्वसन क्रिया तो पूर्ववत करतो. आजकालच्या कोविडच्या काळात आपण ऑक्सिजनची गरज आणि महत्त्व जाणतोच. सावित्रीलादेखील तो अनुभव आला होता. यमराजाने सत्यवानाला कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे (प्राणवायूचा) पुरवठा केला. अर्थात त्यासाठी त्या घनदाट अरण्यातून सावित्रीला बाहेर काढणे गरजेचे होते, हे यमराज जाणत होतेच. म्हणून ते पुढे पुढे जात होते व सावित्री त्यांच्या मागे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे एखाद्याला व्हेंटिलेटरवर ठेवून त्याचे प्राणरक्षण आजकाल केले जाते. हाच मतितार्थ सावित्रीच्या कथेतून मांडला आहे.

मात्र शुद्ध हवेसाठी झाडांची गरज आहे. आजकाल शहरातील फॅशनेबल महिला वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करतात. सत्यवानाने देखील वडाच्या फांद्या तोडल्याने वटवृक्ष संतापला व त्याच्यावर त्या झाडातून कार्बन डाय ऑक्साईडचा मारा झाला, असा बोध घेता येईल. नंतर सत्यवान आणि सावित्री स्वत:च्या राज्यात परतल्यावर त्यांनी आपल्या राज्यात भरपूर वृक्ष लावले व त्यांचे संगोपन, संवर्धन व रक्षण केले. त्याद्वारे ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा त्या राज्याला होऊ शकला. सध्याच्या काळात ही कथा खूपच महत्त्वाची आहे. त्याकडे पुराणातील वांगी पुराणात असे न म्हणता, पुराणातील वानगी (उदाहरण) विद्यमान काळात असे म्हणावे लागेल.

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
मोबा.: ९०११० ८२२९९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या