22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषवेध वनौषधीचा....औषधी गुणधर्माची मायाळू

वेध वनौषधीचा….औषधी गुणधर्माची मायाळू

एकमत ऑनलाईन

मायाळू ही नाजूक आणिा आधाराने वाढणारी वेल आहे. उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात वाढलेली आढळते ब-याच वेळा समशितोष्ण कटिबंधीय हवामानात सुध्दा या वेलीच्या वाढीला पूरक होते. या सदाहरीत वेलीचे मूळस्थान आशिया आणि आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेश असावा असा अंदाज आहे. भारतामध्ये पालेभाजीच्या स्वरूपात या वेलीचा प्रसार खाद्यपदार्थ म्हणून वापर जास्त प्रमाणात केला जातो. अतिशय चांगले औषधी गुणधर्म असलेली ही वेल कोकणात सर्वत्र आढळते.

उपयोग :

१) अंगावरील पित्ताच्या समस्येवर मायाळू अत्यंत गुणकारी औषधी आहे. बºयाच वेळा अग्निमांद्यामुळे (अग्निमंद होते) अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही व त्यामुळे उष्णता निर्माण होऊन अंगावर पित्त उठते. अशा वेळी मायाळूच्या पानाची भाजी खायला द्यावी. कारण ही भाजी गुणधर्माने थंड स्वरूपाची पित्तशामक आहे. तसेच या पानाचा स्वरस काढून पित्त उठलेल्या भागास लावल्यास आग व खाज कमी होण्यास फायदा होतो.

२) रक्तविकारामध्ये मायाळू अत्यंत उपयुक्त आहे. ब-याच वेळा त्वचेवरील विकार हे रक्त अशुध्द झाल्यामुळे होतात. मायाळूच्या पानाच्या भाजीमध्ये रक्त शुध्दीकरणाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास रक्त शुध्द होते व रक्तातील उष्णताही कमी होण्यास मदत होते त्यामळे त्वचाविकार कमी होण्यास फायदा होतो.

३) सांधेदुखीवर मायाळूची भाजी अत्यंत उपयोगी आहे. या वनस्पतीमध्ये सांध्यावरील सुज व वेदना कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी या वेलीच्या कोवळ्या पानांची भाजी नियमितपणे काही दिवस खावी त्यामुळे सांध्यावरील सूज कमी होऊन वेदना होत नाहीत तसेच ही पाने बारीक वाटून त्याचा लेप केल्यासही फायदा होतो.

Read More  संपादकीय : भयाचे जंतू अन् आशेचे तंतू!

४) भाजणे किंवा पोळणे या समस्येवर मायाळू अत्यंत महत्त्वाचे औषध आहे. त्यासाठी या वेलीचा ताजा पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा़ हा तयार केलेला गाळून लोण्याबरोबर चांगला मिसळावा त्यानंतर पोळलेल्या भागावर लावावेत्यामुळे लवकर आराम मिळण्यास मदत होते.

५) जखम दुरुस्त होण्यासाठी मायाळू अत्यंत उपयोगी आहे़ बºयाच वेळा जखमा लवकर दुरूस्त होत नाहीत त्यासाठी या वेलीची ताजी पाने बारीक वाटून त्याचा लगदा तयार करावा. या लगदामध्ये दोनास एक प्रमाणात मिसळून हे मिश्रण जखमेवर लावल्याने लवकर दरूस्त होण्यास मदत होते.

६) मूळव्याधी आजारामध्ये मायाळू अत्यंत गुणकारी औषध आहे़ त्यासाठी वेलीची पाने एकटी किंवा अन्य पालेभाजी बरोबर मिसळून तेलात किंवा तुपात थोडी भाजून घ्यावीत व नंतर गुणकारी औषध आहे. त्यासाठी या वेलीची पाने एकटी किंवा अन्य पालेभाजी बरोबर मिसळून तेलात किंवा तुपात थोडी भाजून घ्यावीत व नंतर दही किंवा डाळिंबाच्या रसामध्ये शिजवून घ्यावीत व त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि सुंठ चुर्ण मिसळून रुग्णाला नियमितपणे काही दिवस खायला दिल्यास मूळव्याधीची समस्या कमी होण्यास मदत होते.

७) अतिसार (डायरिया) विकारामध्ये मायाळू वनस्पती अत्यंत उपयोगी आहे. या आजारामध्ये वारंवार शौचाला जाणे किंवा आणि मल पातळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो़ त्यासाठी या वेलीच्या ताज्या पानाची ही भाजी तुपामध्ये तयार करून त्याबरोबर लोणी आणि डाळिबांचा रस मिसळून रुग्णाला दिल्यास लाभदायक होते.

Read More  शिरूर अनंतपाळ शहरात १२ कोरोनाबाधित रुग्ण

८) मुतखडा विकारावर या मायाळूच्या पानाचा रस अत्यंत गुणकारी आहे़ मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात स्फटिकजन्य पदार्थ जमा होऊन तीव्र वेदना होतात़ त्यासाठी मायाळूच्या ताज्या पानाचा बारीक वाटून त्याचा अंगरस तयार करावा. हा तयार हा तयार केलेला २० मिली रस दररोज सकाळी नियमितपणे काही दिवस घेतल्यास हे खडे विरघळून आपोआप बाहेर निघून पडण्यास मदत होते.

९) मायाळू वनस्पतीची पाने दाहशामक (शांत करणारी) आणि मुत्रल (लघवी साफ करणारी) असून परमा आणि शिस्राग्रदाह व मूत्रदाह यावर अत्यंत उपयुक्त असणारी आहेत. त्यासाठी या वनस्पतीच्या ताज्या पानाची भाजीनियमितपणे काही दिवस रुगणाला खायलाद्यावी त्यामुळे मूत्रदाह कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.

१०) मलावरोध विकारावर मायाळूच्या पानाचा रस अत्यंत उपयुक्त आहे. बºयाच वेळा लहान मुलांमध्ये तंतूमय पदार्थाच्या अभावामुळे व गरोदर महिलांमध्ये गर्भाशयाच्या आतड्यावरील दबावामुळे मलाचे विसर्जन व्यवस्थित होत नाही त्यासाठी मायाळूची ताजी पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. हा ०५ ते २० मिली स्वरस कांही दिवस दिल्यास मलावरोधचा त्रास का होतो.

११) या वेलीच्या खोडामधून चिकट द्रव (श्लेष्मल) निघतो. निघणारा श्लेष्मल द्रव वारंवार होणा-या डोकेदुखीच्या दुखण्यावर प्रसिध्द आणि रामबाण उपाय मानला जातो.

१२) दारूच्या अतिसेवनाने येणा-या नशेच्या समस्येवर मायाळू अत्यंत उपयुक्त आहे. बºयाच वेळा व्यक्ती शुध्दीवर राहत नाही त्यासाठी या वेलीच्या ताज्या पानाचा रस काढावा त्यामध्ये समप्रमाणात दही किंवा ताक मिसळून त्या व्यक्तीला पिण्यास द्यावे त्यामुळे अति दारू सेवनामुळे आलेली नशा कमी होण्यास फायदा होतो.

Read More  लाच घेताना वैद्यकीय अधिका-यास रंगेहात पकडले

१३) वृश्चिक दंशामुळे होणारी वेदना कमी होण्यासाठी मायाळू वनस्पती अत्यंत उपयोगी आहे. ब-याच वेळा विंचु किंवा तत्सम कीटक दंशामुळे असह्य वेदना होतात. त्यासाठी मायाळू वेलीची ताजी पाने स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. हा तयार केला १० ते २० मिली स्वरस दंश झालेल्या व्यक्तीला पिण्यास दिल्यास होणारी वेदना,जळजळ व दाह लवकर कमी होण्यास मदत होते. टिप : वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या