27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषव्हिजन आणि वास्तव

व्हिजन आणि वास्तव

एकमत ऑनलाईन

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने नव्या भारताचे व्हिजन सादर करण्यात आले आहे. पण प्रश्न असा, की आपण सध्या कोठे आहोत. भारतीय अर्थव्यवस्था आता जगाने मान्य केलेल्या जीडीपीतील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच क्रयशक्ती समता (पीपीपी) मध्ये भारताची अर्थव्यवस्था तिस-या क्रमांकावर आहे. १९५० च्या दशकात भारताचा जीडीपी हा ३०.६ अब्ज डॉलर होता. २०१७ मध्ये हाच जीडीपी २.५४ ट्रिलियन डॉलर आणि पीपीपीमध्ये ९.६९ ट्रिलियन डॉलर झाला. भारताचे औद्योगिक क्षेत्र हे देशांतर्गत जीडीपीच्या २९.०२ टक्के आहे. आर्थिक आणि औद्योगिक आघाडीवर भारताची वेगाने होणारी घोडदौड पाहता भारताला नव्याने विकसित होणा-या औद्योगिक देशांच्या श्रेणीत सामील करण्यात आले आहे.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी भारताची लोकसंख्या ही सुमारे ३४ कोटी होती. साक्षरतेचा दर हा १२ टक्के होता आणि त्यानुसार चार कोटी १० लाख नागरिक साक्षर होते. २०१७ मध्ये भारताची लोकसंख्या १३४ कोटी झाली आणि साक्षरतेचा दर हा ७४ टक्के म्हणजेच १ अब्जापर्यंत पोचला.

आकड्यात झालेला मोठा बदल ही भारताची उल्लेखनीय कामगिरी आहे. ही आकडेवारी आश्चर्यकारक आहेच आणि म्हणूनच अन्य एका देशाशी त्याची तुलना करता येऊ शकेल. तो देश म्हणजे चीन. १९४९ मध्ये चीनची लोकसंख्या ५४० दशलक्ष होती आणि साक्षरतेचे प्रमाण हे २० टक्के म्हणजेच १०४ दशलक्ष होते. २०१७ मध्ये चीनची लोकसंख्या ही १.३४ अब्ज झाली आणि साक्षरतेचे प्रमाण हे ८५ टक्के झाले. म्हणजेच चीनमधील १.१४ अब्ज नागरिक साक्षर झाले. चीनने हा पल्ला विनासायास गाठला आणि लालफितीच्या कारभाराचा हस्तक्षेप न होता ध्येय निश्चितीचे नियोजन करण्यात आले. भारतात मात्र हेच काम ऐच्छिक शिस्तीने पार पाडले गेले. यानुसार तुलना केल्यास स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या काळात हीच मोठी मिळकत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी जगाच्या जीडीपीत भारताचा वाटा केवळ ३ टक्के म्हणजेच २.७ लाख कोटी रुपये होता. २०१७ मध्ये ‘आयएमएफ’च्या मते भारताचा जगाच्या जीडीपीत ८.५ टक्के वाटा असून तो आता १३५ लाख कोटी आहे. यंदाचा भारताचा जीडीपी हा पूर्वीच्या वसाहतवादी सत्ताधा-यांच्या तुलनेत अधिक आहे. १७०० मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती. १९४७ मध्ये हा दर्जा दयनीय पातळीवर आला. पण जागतिक जीडीपीच्या वाढीत भारताचे १७ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान राहिले. विशेष म्हणजे या वाढीत देशांतर्गत स्रोतांचा मोठा वाटा आहे. देशात काटकसरीचा दर हा जीडीपीच्या ८ टक्क्यांवरून ३१ टक्के झाला आहे.

अलीकडच्या काळात बसलेल्या आर्थिक झटक्यानंतर त्यात निरंतर वाढ सुरू आहे. दुसरीकडे भारताचे १९४७ मध्ये खाद्यान्न उत्पादन हे ५० दशलक्ष टन होते आणि ते आता पाच पटीने वाढले आहे. भारताने दुष्काळ संपविला आहे, हे प्रामुख्याने सांगता येईल. भारतात १९४३ मध्ये सर्वांत मोठा दुष्काळ पडला. बंगालमध्ये सुमारे २० लाख नागरिकांचे भूकबळी गेले. याउलट १९६५ मध्ये बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला, परंतु तेथे कोणाचाही मृत्यू झाला नाही. त्यानंतर भारताला दुष्काळाला सामोरे जावे लागले नाही. ज्या गोष्टीला श्रेय दिले पाहिजे, तेथे आरोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी भारताचा गरिबीचा दर हा सुमारे ८० टक्के होता. म्हणजेच २५० दशलक्ष नागरिक गरीब होते. १९५६ मध्ये गरिबांची मोजदाद सुरू झाली तेव्हा योजना आयोगाचे प्रोफेसर बी. एस. मिन्हास यांनी मांडलेल्या तर्कानुसार देशात ६५ टक्के म्हणजेच २१.५ कोटी नागरिक गरीब असल्याचे सांगितले गेले. १९४७ मध्ये भारताच्या जीडीपीत शेतीचा वाटा ५४ टक्के होता आणि तो २०१७ मध्ये १३ टक्के राहिला आहे. स्वातंत्र्याच्या वेळी ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून होते. २०१७ मध्ये हेच प्रमाण ५२ टक्क्यांवर आले. म्हणजेच ६५० दशलक्ष नागरिक शेतीवर अवलंबून आहेत.

यात यशापयशाचा खेळ तर असणारच. आज स्थिती अशी आहे की मोठ्या लोकसंख्येजवळ जमीन नाही. जी जमीन आहे, ती मर्यादित आहे, परंतु लोकसंख्या अमर्यादित आहे. २०५० मध्ये भारताची लोकसंख्या ही १ अब्ज ७० कोटींपेक्षा अधिक होईल आणि लोकसंख्येचा मोठा भाग हा शेती आणि ग्रामीण भागाबाहेर फेकला जाईल. स्वातंत्र्याच्या या सात दशकांत आपण कशी वाटचाल केली आणि काय केले, याचे स्पष्टीकरण मांडावयाचे झाल्यास साहजिकच आपण चांगली कामगिरी केली आहे, असे ढोबळमानाने म्हणता येईल. १९४७ मध्ये भारताने संपूर्ण लोकशाही निवडली आणि समानतेचा पुरस्कार केला. त्याचवेळी शेजारी देशाचे आकलन करताना त्या देशाने अशी प्रणाली निवडली की लोकशाही ही काही लोकांपुरतीच मर्यादित होती. नक्कीच आपण आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो, पण एकात्मिक आणि आशावादी देश होण्यापेक्षा आणखी काय चांगले होऊ शकले असते?

-मोहन गुरुस्वामी,
माजी आर्थिक सल्लागार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या