24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeविशेषभक्तांविना वारी पंढरीची

भक्तांविना वारी पंढरीची

एकमत ऑनलाईन

पंढरपूची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठा वारकरी सोहळा आहे. प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाकडे वारी चुकवू न देण्याची प्रार्थना करतो़ मात्र सध्या कोरोनारूपी महामारीच्या पार्श्वभुमीवर आषाढी वारी आणि पायी पालखी सोहळा होणार नसल्याने वारकरी संप्रदाय फार दु:खी आहे़ विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागली आहे.

दिंडीत चालत येउन मिळण्-या आनंदाची तुलना कशाशीच होउ शकत नाही. गरीब कष्टकरी शेतक-यापासून नोकरदार, राजकीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते वारकरी म्हणून दिंडयातून पंढरपूरला चालत येतात़ यामधुन जगण्याला उर्जा मिळते आणि जसजसे पंढरपूर जवळ येथे विठुरायाच्या ओढीची आर्तता अधिक तीव्र होते़ माझे जिवेची आवडी पंढरपूरा नेईन गुढी ! या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी टाळ, मृदुंग, विणा, पताका, तुळस घेऊन चालत असतो.

२८ युगांपासून हा पहिला आषाढी सोहळा असेल की भक्ताविना वारी आषाढीची़ वारकरी हे पंढरपूरला जाऊन सावळया विठुरायाचे पदस्पर्श घेऊन मुखदर्शन घेऊ शकत नाहीत़ असे असले तरी वारक-यांच्या मनातील भाव आणि विठ्ठलाप्रती असलेली ओढ कमी होणार नाही़ कोरोनारूपी महामारीचे संकट पांडुरंग लवकरच दूर करेल असा सर्वांना विश्वास आहे़ संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला.

त्यानंतर ऐबतबाबा आरवाळकर यांनी सुरू ठेवला़ माऊलीच्या पालखी सोहळयात सुमारे ४०० च्या वर दिंडया येत असतात़ महाराष्ट्र ही संत रत्नांची खाण आहे त्यामध्ये परमपुज्य श्रीसंत वासुदेव महाराज होते़ वासुदेव महाराजांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून ते ९२ व्या वर्षापर्यंत किर्तन , प्रवचन केले़ १९३८ पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत २००९ पर्यंत अखंड वारी केली़ श्रीसंत वासुदेव महाराजांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत़ महाराष्ट्र शासनाने आयुर्वेदाच्या ज्ञानाबद्दल महाराजांना पुरस्कृत केले आहे.

श्रीसंत वासुदेव महाराजांनी आषाढी श. १०, २ जुलै २००९ ला विश्वमाउली ज्ञानेश्वरांची पालखी आल्यानंतर आपला देह श्री विठ्ठल चरणी लीन केला़ पंढरपूरला महाराजांची भव्य दिव्य अशी वास्तु आहे़ या ठिकाणी भक्तांच्या सुविधांची व्यवस्था आहे़ संस्थाध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले, अविभाऊ गावंडे, शिल्पकार रविंद्र वानखडे, महादेवराव ठाकरे, नंदकिशोर हिंगणकर, अशोकराव पाचडे, अंबादास महाराज, पुरूषोत्तम लाजुलकर, जयदिप सोनखासकर, सुनंदाताई आमले, हैबतबाबा आरफळकर, प्रा़ साहेबराव मंगळे, माधवराव मोहोकार, डॉ़ अशोकराव बिहाडे, गजाननराव दुधाट व संपूर्ण विश्वस्त मंडळाची खुप मोलाची कामगिरी आहे़ यंदा कोरोनाच्या संकटामुळे आॅनलाईन वारी साजरी करावी लागणार आहे़
प्रत्येक भक्तांचे घरच पंढरी होउन जाईल. पांडुरंग प्रत्येक वारक-यांच्या घरी जाउन आपल्या भक्तांची आस पुरवणार आहेत़ यावर्षीची वारीही भक्ताविना वारी पंढरीची असणार आहे.

सौ. अंजली प्रमोद बिहाडे
पंढरपूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या