26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeविशेषटरबूज बिया - फायदे

टरबूज बिया – फायदे

एकमत ऑनलाईन

आपण टरबूज खाताना आतील लाल रंगाचा आणि चवदार गर खातो पण टरबूजाच्या काळ्या रंगाच्या बिया फेकून देतो. या बियाचे वरचे कवच कठीण असले तरी त्यात अनेक पौष्टिक तत्व दडलेले असतात. कलिंगडाच्या बियामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, तांबे, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात याशिवाय ओमेगा-३ आणि ओमेगा-६ सारखे पीष्टिक घटक सुध्दा असतात. या बियामध्ये कॅलरीज (उष्मांक) मात्र कमीच असतात. या बिया आपण चावून चावून खाऊ शकतो किंवा या बियाचे तेल काढूनही त्याचा दैनंदिन आहारात समावेश करू शकतो या बिया स्रॅक्सचा पर्याय म्हणून सुकवून किंवा भाजूनही खाऊ शकतो. उपयोग : ४ रोग प्रतिकार शक्ती : कमकवुत रोग प्रतिकार शक्ती असल्यास आपल्याला अनेक आजाराचा संसर्ग किंवा ज्वर येणे यासारख्या समस्येचा सामना करावा लागतो. टरबूज बिया जीवनसत्व-ब कॉम्पलेक्सचा स्त्रोत असल्यामुळे आपली रोगाची प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. तसेच या जीवनसत्व-ब मध्ये नायसिन, फोलेट, थायमिन, रिबोफ्लेविन, पेंटाथेनिक आम्ल, जीवनसत्व-ब-६ असतात. त्यासाठी आपण भाजलेल्या बिया देखील खाऊ शकतो.

४ मजबूत हाडे : कलिंगडाच्या बियामध्ये पोटॅशियम, मॅगनिज, तांबे यासारखे खनिजे असतात. ज्यामुळे हाडाची मजबती वाढण्यास फायदा होतो. वाढत्या वयाबरोबर हाडाशी संबंधीत बरेच आजार (हाडाची घनता कमी होणे, हाडे ठिसूळ होणे) यासारखे आजार निर्माण होतात. त्यासाठी दररोज एक कप भाजलेल्या कलिंगडाच्या बिया खाल्यानंतर हाडाशी संबंधीत कोणतेही आजार होत नाहीत. ४ हृदयाचे आरोग्य: हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी आजाराच कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता असते. टरबुजाच्या बिया मॅग्नेशियमचा स्त्रोत आहे. १०० ग्रॅम टरबूज बिया खाल्यास दैनंदिन मॅग्नेशियमची (१३९%) गरज भासते ज्यामुळे हृदयाची गती व रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते तसेच कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदय निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी टरबुजाच्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत.

४कर्करोग : आपल्या शरीरातील पेशीच्या अनियंत्रीत वाढीमुळे होणारा आजार म्हणजे कर्करोग होय. हा आजार कोणत्याही पेशीमध्ये कोणत्याही उतीमध्ये आणि कोणत्याही अवयव मध्ये होऊ शकतो. या पेशीचे अतिरिक्त गोठोडे म्हणजे ट्युमर असते. टरबुजाच्या बियामध्ये लायकोपीन नावाचे तत्व असते जे शरीराला अनेक प्रकारच्या कर्करोगापासून वाचवण्यास मदत करते.
४मधुमेह: या आजारामध्ये आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रीत राहत नाही. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन इतर अनेक आजाराच्या विळखा आपल्या शरीराभोवती तयार होतो. त्यासाठी कलिंगडाच्या मुठभर बिया एक लिटर पाण्यात मंद आचेवर १५ मिनिटे उकळाव्यात आणि हे पाणी दररोज चहाप्रमाणे पिल्याने मधुमेहाचा उपचारात फायदा होतो. ४ पचनक्रिया : टरबुजाच्या बियामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात तसेच या बिया अनेक पोषक तत्वांनी समृध्द असतात. त्यामुळे आपल्या पचनाशी संबंधीत कोणत्याही प्रकारची असलेली समस्या दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी भाजलेल्या टरबुजाच्या बियाचे सेवन करावे ज्यामुळे पचनक्रियेत सुधारणा होऊन योग्य पचन होण्यास मदत होते. ४ प्रणय शक्ती : सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या युगात सुध्दा कलिंगडाच्या बियांना वायग्रा पेक्षा जास्त प्रभावशाली मानले जाते. या बियामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आपले शरीर नेहमी सशक्त राहते विशेष म्हणजे कलिंगडाच्या बियाचे सेवन नियमित केल्याने नंपुसकता दूर होण्यास मदत होते. या बियाच्या सेवनाने संभोगाच्या वेळी जास्त सुख देणारा टेस्टास्टेरॉन उत्तेजीन तो अधिक कार्यशील होऊन प्रणयसुख मिळते. ४शरीराचा सर्वांगीण विकास :आपल्या शरीराच्या चांगला विकास होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अमिनो आम्लाची गरज असते जे टरबुजाच्या बियात उपलब्ध असतात. टरबुजाच्या बियामध्ये अर्जिनिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन आणि ग्लुटामिक अमिनो आम्ल असतात ज्यामुळे विविध प्रकारच्या शारिरीक कार्यशक्तीची क्षमता वाढते त्यासाठी टरबुजाच्या भाजलेल्या मुठभर नियमित खाव्यात. ४ रक्तदाब : कलिंगडाच्या बिया रक्तदाब नियंत्रीत करण्यास उपयुक्त आहेत. यामध्ये विपूल प्रथिनाचा साठा असतो. ज्यात अनेक अमिनोऑम्ल असतात यापैकी अर्जिनीन एक महत्वाचे आम्ल असून ज्याचा उपयोग रक्तदाब संतुलीत ठेवण्यासाठी होऊ शकतो. विशेष म्हणजे बियामधील मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियमित राहतो त्यासाठी कलिंगडाच्या मुठभर बिया आहारात असाव्यात.

४ स्मरणशक्ती : टरबुजाच्या बिया स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि मनाची सर्तकता तीक्ष्ण होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. वाढत्या वयानुसार वृध्दावस्थेमध्ये विसरण्याची समस्या निर्माण होते. तसेच काही मुलांना वाचलेले काहिही आठवत नाही. त्यासाठी टरबुजाच्या बियाचा चहा करून प्यायला द्यावा. त्यामुळे यातील ग्लुटाामिक आम्लामुळे मानसिक आरोग्य वाढून स्मरणशक्ती चांगली राहते. ४ काविळ : या आजारामध्ये रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण वाढल्यास आपल्या डोळयांना पिवळेपणा येतो. हा आजार प्रामुख्याने यकृतावरील दुष्परिणामुळे होणारा आहे. त्यामध्ये कधी कधी प्राणघातक सुध्दा होऊ शकतो. काविळीसारख्या आजारावर कंिलगडाच्या बिया अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी कावीळीची समश्या असलेल्या रूग्णांनी भाजलेल्या बियाचे सेवन केल्यास लाभदायक होते. ४ अ‍ॅसिडीटी : ज्यांना आम्लेचा त्रास आहे त्यांना पोटात सुज येते तसेच खाल्लेल्या अन्नाचे अपचन झाल्यामुळे गॅस, आंबट-कडू-ढेकर किंवा तोंडात आंबट पाणी येते व पोटात जळजळ होऊन उलटया येतात. अशा व्यक्तींनी आपल्या आहारात टरबुजाच्या भाजलेल्या बियाचा समावेश केल्यास फायदेशिर होते.

४ प्रजनन : अनेक पुरूषांमध्ये लैंगिक दुर्बलता असते त्यामुळे मुल होण्यात अडथळा येतो. यासाठी टरबुजाच्या खूप लाभदायक आहेत. टरबुजाच्या बियामध्ये जस्ताचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पुरूषाच्या प्रजनन प्रणालीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. त्यासाठी अशा पुरूषांनी नियमितपणे टरबुजाच्या बियाचे नियमित सेवन केल्यास प्रजनन क्षमता वाढते. ४ केसांचे आरोग्य : कलिंगडाच्या बियामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम आढळते. ज्यामुळे केस गळणे आणि केस तुटणे या समस्या कमी होतात. तसेच या बियात लायकोपीन नावाचे घटक असते जे केसांना चमक आणण्यासाठी आणि डोळयातील कोंडा कमी होण्यासाठी मदत करतात. या बिया चघळल्याने केस मजबूत होतात किंवा त्यासाठी या बियाचे तेल देखील फायद्याचे आहे. ४ थकवा :आपल्या शरिरातील रक्तामध्ये हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे लवकर थकवा जाणवतो त्यासाठी टरबुजाच्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या