20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

एकमत ऑनलाईन

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ देवींच्या नावांचे नऊ अर्थ आणि या नावांशी संबंधित देवींच्या जीवनावर आधारित कहाण्याही प्रसिद्ध आहेत. जर आपण देवीची ही नऊ रूपे पाहिली आणि त्या नऊ नावांचे अर्थ समजून घेतले, तर प्रत्येक रूपात देवी सशक्त आहे, हे स्पष्ट होते. स्त्रीसंबंधी अशा प्रकारचे चिंतन, आदर्श आणि व्यवहार कोणत्याही देशात, कोणत्याही युगात झाला नसेल. स्त्रीसाठी तिची आर्थिक शक्तीच सर्वांत महत्त्वाची आहे, हे तितकेच खरे. आर्थिकदृष्ट्या सशक्त असणारी स्त्री तिच्या निसर्गदत्त आणि सामाजिक शिक्षणातून प्राप्त झालेल्या सर्व गुणांची अभिव्यक्ती करू शकते. इतिहास असे सांगतो की, ज्या महिला कोणत्याही परिसरात यशस्वी झाल्या, त्या सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या.

आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवसही नुकताच पाळला गेला. स्त्रीला देवी मानून पुजणा-या समाजाने सर्वप्रथम स्त्रीच्या आर्थिक शक्तीचा विचार केला पाहिजे. आजच्या काळात महिलांचे शोषण होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणे हेच आहे, हेही समजून घेतले पाहिजे. प्रचंड मेहनत करूनसुद्धा अनेक स्त्रियांना त्यांचा मेहेनताना योग्य प्रमाणात मिळत नाही. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकत नाहीत. आजच्या आर्थिक स्थितीवर विचार करता आपल्याला असे म्हणता येईल की, महिला आर्थिक आधारावर तीन सामाजिक स्तरांवर संघर्ष करून आपली आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करतात. समृद्धीच्या शिखरावर बसलेल्या उच्च वर्गातील महिलांना त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची चिंता करण्याची गरज नसते. उलट त्या अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवतात आणि प्रत्येक सक्षम महिलेने हे करायलाच हवे.

दुसरा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग. या वर्गातील महिलांची संख्या अधिक आहे. स्वातंत्र्यानंतर याच वर्गातील महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. सुशिक्षित असल्यामुळे आपल्या योग्यतेच्या आधारावर अनेक छोट्या-मोठ्या क्षेत्रांत या महिला उच्च पदावर विराजमान झालेल्याही दिसतात. शिक्षण, व्यापार, विज्ञान, कला-संगीत, सिनेसृष्टी अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची घोडदौड मोठ्या वेगाने सुरू आहे. या महिला अर्थार्जनही करीत आहेत आणि घराची, कुटुंबाची देखभालही करीत आहेत.

युरोपात कोरोनाची दुसरी लाट

भाजपच्या अखिल भारतीय महिला मोर्चाची प्रमुख या नात्याने मी १९८१ मध्ये सरकारसमोर दोन मागण्या ठेवल्या होत्या. पहिली मागणी अशी की, महिलांसाठी जास्तीत जास्त अंशकालीन (पार्टटाईम) नोक-यांची व्यवस्था करावी. दुसरी मागणी अशी की, काम घरी घेऊन येण्याची सुविधा महिलांना असावी. त्या काळातही बहुतांश सुशिक्षित महिला घरीच बसत असत. कारण घरातील वयोवृद्धांची आणि लहान मुलांची देखभाल करायची असल्यामुळे पूर्ण वेळ नोकरीच्या ठिकाणी त्या देऊ शकत नसत. शिकल्या-सवरलेल्या असूनसुद्धा केवळ घरकाम करावे लागल्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होत असे. ‘तुम्ही काय करता?’ असा प्रश्न विचारल्यावर त्या संकोचत असत आणि खेदानेच म्हणत असत, ‘काहीच नाही!’ घरातल्या एवढ्या सगळ्या जबाबदा-या सांभाळूनसुद्धा त्यांचं हे उत्तर त्यांची कधीच जगासमोर न आलेली वेदना सांगणारे होते.

त्यामुळेच मी या दोन मागण्या केल्या होत्या. जेणेकरून महिला अर्थार्जनही करू शकतील आणि घरही सांभाळू शकतील. तिसरा वर्ग आर्थिकदृष्ट्या अतिमागास मानल्या जाणा-यांचा आहे. रोजच्या रोज कमावून रोजच्या रोज खाणा-यांचा हा वर्ग आहे. या समाजातील महिला तर पहिल्यापासूनच शेती, उद्योगधंदे, छोटी-मोठी दुकाने आणि साफसफाईसारखी कामे करून पैसा मिळवीत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागत असे.
आजच्या काळात या तीनही वर्गांमधील महिलांची परिस्थिती कमी-अधिक फरकाने पूर्वीसारखीच आहे. मध्यमवर्ग आणि निम्न वर्गातील महिला आपल्या कामाबद्दल आणि उत्पन्नाबद्दल समाधानी नाहीत, हे मान्य करावे लागेल. त्या अंग मोडून मेहनत करतात; परंतु त्यांच्या घामाचे उचित मोल होत नाही. आजच्या महिलेला कौटुंबिक, राजकीय आणि आर्थिक कायद्यांचे बरेच ज्ञान आहे.

त्यामुळे योग्य अधिकार न मिळाल्यास त्या पूर्वीपेक्षा अधिक दु:खी होतात. महिलांचा आर्थिक विकास आणि स्वावलंबन केवळ त्यांच्याच हिताचे आहे असे नाही, तर संपूर्ण कुटुंबात सुख-शांती आणण्यासाठी ते सा भूत ठरते. महिलांच्या मेहनतीच्या कमाईचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाऊन देशाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाची घोषणा करता येणे शक्य आहे. नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारताच्या श्रमशक्तीत सध्या महिलांचे योगदान अवघे २७ टक्के आहे. जगाची या बाबतीतील सरासरी ४८ टक्के असून, आपल्याला त्याच्या आसपास पोहोचावे लागेल. जर असे घडले तर भारतीय अर्थव्यवस्थेत आणखी ७०० अब्ज डॉलरची भर पडेल. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात महिलांचे योगदान २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मातृशक्ती थेट अर्थव्यवस्थेशी जोडली गेली नाही, तर विकासाचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.

कोरोनातील विम्यामुळे कंपन्यांचे दिवाळे

पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा विषय ताकदीनिशी उचलून धरला आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्यात अर्धी हिस्सेदारी महिलांची असावी लागेल. महिलांना सुखी, कुटुंबांना निरोगी आणि देशाला विकसित बनविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. महिलांना अधिकाधिक संख्येने कायमस्वरूपी काम आणि रोजगार सुरू करण्यासाठी अर्थसा मिळायला हवे. गेल्या तीस वर्षांत स्थापन झालेल्या स्वयंसेवी समूहांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. या क्षेत्राकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळातसुद्धा लाखो स्वयंसेवी समूह तयार झाले आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात सामील असणा-या महिलांना मिळणारे आर्थिक उत्पन्न त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे ठरले आहे आणि त्या आनंदी दिसू लागल्या आहेत.

स्वयंसेवी समूहांची पुन्हा एकदा मोठी चळवळ उभारली जाऊ शकते. या चळवळीमुळे कोट्यवधी महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनविता येईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल.कोरोनाच्या संसर्गकाळात महिलांना आणि पुरुषांना रोजगार देण्यासाठी अनेक उपयुक्त योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचायला हवा. योजनांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण झाल्यास ते देशाला निश्चितच पुढे नेणारे ठरेल. महिलांना इच्छा असेल, त्या उद्योग, व्यवसायाशी जोडले जाण्याची संधी मिळवून दिली पाहिजे. ‘वर्क फ्रॉम होम’ या नव्या कार्यशैलीचाही महिलांना मोठा लाभ होऊ शकेल.

मृदुला सिन्हा
माजी राज्यपाल, गोवा

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...