22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home विशेष ही कोणती सामाजिक सुरक्षा?

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

एकमत ऑनलाईन

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले जाईल. मात्र कोणत्या ५० कोटी लोकांना ही विमा सुरक्षितता दिली जात आहे आणि कशाच्या आधारावर दिली जात आहे, याचा कोणताही स्पष्ट खुलासा सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. त्याच वेळी दुसरीकडे देशातील आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) कंपन्या मेडिक्लेम पॉलिसीचा मनमानी हप्ता ज्येष्ठ नागरिकांकडून वसूल करीत आहेत. सरकारने आणि ‘इर्डा’ अर्थात विमा नियामक प्राधिकरणाने या मनमानीविषयी मौन बाळगले आहे. अशा वेळी असा प्रश्न उपस्थित होतो की, वयस्कर व्यक्तींना प्रचंड प्रमाणात विमा हप्ता भरायला लावणारी ही कोणती ‘सामाजिक सुरक्षा’ आहे?

एका खासगी कंपनीत काम करून निवृत्त झालेल्या ६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची आणि त्याच्या पत्नीची पाच लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी आहे. ते स्वत: गेली २५ वर्षे सलगपणे या पॉलिसीचा हप्ता भरत आहेत. परंतु तरीही कंपनीकडून त्यांच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम सातत्याने वाढविलीच जात आहे. सध्या या वयोवृद्ध व्यक्तीला वर्षाकाठी तब्बल ८२ हजार रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो आहे. पुढील वर्षी ते ७० वर्षांचे होतील आणि त्या वयात त्यांना पाच लाखांच्या विमा पॉलिसीवर १ लाख रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

गेल्या २५ वर्षांत केवळ दोन वेळा त्यांनी रुग्णालयात भर्ती होऊन शस्त्रक्रिया करून घेतली आहे आणि केवळ ४.७५ लाखांचा दावा केला होता. त्यातही त्यांना क्लेमची रक्कम मिळाली नाहीच. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने ‘नो क्लेम बोनस’ देणेही बंद केले आहे. पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा असतानासुद्धा त्यांना केवळ २५०० रुपये दर असलेल्या रुग्णालयातच भर्ती होण्याची परवानगी आहे. वस्तुत: मुंबईसारख्या महागड्या शहरांमध्ये केवळ शासकीय सर्वसाधारण रुग्णालयातच एवढ्या कमी दरात रूम मिळू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात विमेदाराचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी मेडिक्लेम पॉलिसीच्या हप्त्याची (प्रीमियम) रक्कमही वाढत जाते.

चिंचोली येथे कु-हाडीचे घाव घालून पतीकडून पत्नीचा खून

ही सूट कंपन्यांना सरकारनेच दिलेली आहे. विमा नियामक प्राधिकरणानेही असेच अतार्किक नियम तयार केले आहेत. म्हणजे, जितके वय अधिक तितका प्रीमियम अधिक! सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही सवलत किंवा अनुदान नाही. युरोपीय देशांमधील सरकारे प्रत्येक नागरिकाला रुग्णालयांत मोफत उपचारांची सुविधा देतात. परंतु भारतात मात्र सरकारी दवाखान्यांमध्य सुविधांची वानवा आहे आणि खासगी रुग्णालयांमध्ये मनमानी बिलवसुली केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना उपचार करून घेणे आणि मेडिक्लेमची पॉलिसी घेणे या दोन्ही गोष्टी अशक्य बनत चालल्या आहेत. देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीय घरांमधील ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. या ज्येष्ठ मंडळींना सरकारकडूनही कोणतीच मदत मिळत नाही आणि कमाईचे साधन नसल्यामुळे किंवा मर्यादित उत्पन्न असल्यामुळे महाग होत जाणा-या प्रीमियमची पॉलिसी खरेदी करणे शक्य होत नाही.

देशात मेडिक्लेमसारख्या आरोग्य विमा पॉलिसीसंदर्भात जे अव्यावहारिक धोरण आहे, त्याचा फायदा घेऊन विमा कंपन्या विमेदाराचे वय जसजसे वाढत जाईल, तसतसा अधिक प्रीमियम वसूल करतात. उदाहरणच घ्यायचे झाल्यास एका सरकारी विमा कंपनीने आपल्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत ३५ वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीला बेसिक कव्हरसाठी केवळ ६३९६ रुपये वार्षिक विमा हप्ता ठेवला आहे आणि जसजसे त्या व्यक्तीचे वय वाढत जाते, तसतशी प्रीमियमची रक्कम वाढविली जाते. विमाधारकाने क्लेम घेतला किंवा घेतला नाही तरी हप्ता वाढतच जातो. संबंधित कंपनी ५१ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तीकडून तिप्पट म्हणजे १७ हजार १३ रुपये प्रीमियम घेत आहे. त्याचप्रमाणे ६५ ते ६९ या वयोगटातील व्यक्तींकडून वार्षिक ४२ हजार ११८ रुपयांचा घसघशीत वार्षिक हप्ता वसूल केला जात आहे.

डाळी, तेल आणि कांदा अत्यावश्यक वस्तूबाहेर; ६५ वर्षांपासूनच्या कायद्यात बदल

त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, सरकारी विमा कंपन्या क्लेम देताना फारसा त्रास देत नाहीत, असे विमेदारांचे म्हणणे आहे. परंतु खासगी कंपन्या मात्र वेगवेगळे नियम पुढे करून मोठ्या प्रमाणावर काटछाट करतात. ‘हे कुठले नियम,’ असे जेव्हा विमेदार विचारतो तेव्हा त्याला विमा पॉलिसीच्या मागील बाजूवर सहा पॉइंटसाइजमध्ये छापलेले नियम दाखविले जातात, जे भिंग लावल्याखेरीज दिसत नाहीत. मुख्य म्हणजे, विमेदाराला हे नियम दाखवून गप्प करताना कंपन्या संबंधिताला भिंग पुरवतात. सवाल असा की, विमा पॉलिसी विकतानाच संबंधित विमेदाराला भिंग देऊन हे नियम वाचायला का दिले जात नाहीत? विमेदारकाची अशी फसवणूक करणे शक्य होऊ नये म्हणून कठोर आणि पारदर्शक नियम करण्याची जबाबदारी विमा नियामक प्राधिकरणावर आहे की नाहीच?

खरे तर सरकारने कमी उत्पन्नगटातील लोकांसाठी प्रीमियमची कमाल रक्कम निर्धारित केली पाहिजे आणि ती पुढे आयुष्यभर वाढविली जाणार नाही, याची विमेदाराला हमी असली पाहिजे. अन्यथा ‘आयुष्मान भारत’च्या धर्तीवर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी परवडण्याजोगी नवी सामाजिक आरोग्य विमा योजना आणावी. ज्याप्रमाणे आयुर्विम्याच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम निश्चित असतो आणि तोच कायम राहतो, त्याप्रमाणे विमेदाराने जर कमी वयातच आरोग्य विमा घेतला असेल आणि दरवर्षी नियमितपणे प्रीमियम भरला असेल, तर अशा पॉलिसीसाठी संपूर्ण अवधी पूर्ण होईपर्यंत एकसमान प्रीमियम असायला पाहिजे. असे झाले तरच उतारवयात अधिक प्रीमियम भरण्याचा ताण संबंधितांवर येणार नाही. त्याचप्रमाणे सरकारने मध्यमवर्गीय विमेदारांना आरोग्य विम्यासाठी काही अनुदानही देणे गरजेचे आहे.

विनिता शाह

ताज्या बातम्या

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

आणखीन बातम्या

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...