सध्या जगातील काही देशांत मंकीपॉक्स या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. हा विषाणू प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. परंतु आता सापडलेल्या रुग्णांंनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येत आहे. भारतामध्ये सध्या या विषाणूमुळे संसर्ग झालेला एकही रुग्ण नसून आपण घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र सरकारी आरोग्य यंत्रणेने इतर देशांमधील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे.
मार्च २०२० पासून कोरोना व्हायरसच्या भीतीच्या सावटाखाली असणारे जग २०२२ च्या पूर्वार्धात सुरळीतपणे पुन्हा सुरू झालेले असताना, जानेवारीमध्ये ओमिक्रोनच्या फैलावामुळे पुन्हा काही काळ चिंतेत होते. भारतात इतर देशांच्या तुलनेने ओमिक्रॉनची लाट खूपच सौम्य आली आणि त्यामुळे लाखो लोकांचा जीव तर वाचलाच; पण कोट्यवधी लोकांना लॉकडाऊनपासून मुक्ती मिळाली. कोविडचा २०२० पासून चालू असलेला ऊन-सावलीचा खेळ आता जवळपास संपत आला आहे आणि जग पुन्हा नवीन आशेने सुरुवात करत आहे. हे सर्व काही सुरळीत होत असताना भविष्यात पुन्हा कोणताही विषाणू किंवा जिवाणू नवीन संकट उभे करणार नाही, या भोळ्या आशेत राहणे मानवाला परवडणार नाही. कोरोनानंतरच्या जगात जे काही नवीन संकट उभे राहील ते कदाचित यापूर्वीही येऊनच गेलेले असेल किंवा त्याची
छोटीशी झलक आपणाला पूर्वी दिसलेली असेल. जसे कोरोना हा २००२ मध्येसुद्धा चीनमध्ये काही ठिकाणी आपली ओळख ठेवून गेला होता आणि पुन्हा २० वर्षांनंतर अतिशय ताकदवान होऊन आला. त्याचप्रकारे भूतकाळातील अनेक विषाणू आणि जिवाणूसुद्धा असेच भविष्यात उद्रेक करतील.
हे सांगण्याचा किंवा लिहिण्याचा मुद्दा म्हणजे सध्या जगातील काही देशांत सापडत असलेले मंकीपॉक्स या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण. हा विषाणू प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. १९५८ मध्ये माकडांमध्ये आणि १९७० मध्ये मानवांमध्ये प्रथम हा विषाणू सापडला. १९७० ते १९८६ दरम्यान मानवांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेली ४०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. विषुववृत्तीय मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत १० टक्क्यांच्या मर्यादेत मृत्युदर आणि दुय्यम मानव-ते-मानवी संसर्ग दर सुमारे समान प्रमाणात असलेले लहान विषाणूजन्य उद्रेक नियमितपणे घडतात. संसर्गाचा प्राथमिक मार्ग संक्रमित प्राणी किंवा त्यांच्या शरीरातील द्रवांशी संपर्क असल्याचे मानले जाते. आफ्रिकेबाहेर पहिला प्रादुर्भाव २००३ मध्ये मिडवेस्टर्न युनायटेड स्टेट्समध्ये इलिनॉय, इंडियाना आणि विस्कॉन्सिन येथे झाला होता. एक घटना न्यू जर्सीमध्ये होती. पण यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही.
विषाणूचा प्रसार आणि संसर्ग
हा विषाणू प्राण्यांपासून माणसात आणि माणसाकडून पुन्हा इतर माणसात पसरू शकतो. प्राण्याच्या चाव्याद्वारे किंवा संक्रमित प्राण्याच्या शरीरातील द्रव्यांशी थेट संपर्क साधून प्राण्यापासून माणसाला संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थातून थेंबाच्या श्वासोच्छवासाद्वारे आणि फोमाइट्स (स्पर्श करण्यायोग्य पृष्ठभाग) यांच्या संपर्काद्वारे माणसापासून माणसात पसरू शकतो. मानवी मंकीपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणू, ऑर्थोपॉक्स विषाणू आणि व्हेरिओला विषाणू (स्मॉलपॉक्स) यांचा जवळचा नातेवाईक किंवा त्यांच्याशी साधर्म्य असलेला विषाणू आहे. याचा इन्क्युबेशन म्हणजे सहउष्मायन कालावधी १० ते १४ दिवसांच्या दरम्यान असतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणांमध्ये लिम्फ नोड्सची सूज म्हणजेच टॉन्सिल्स किंवा जिथे आपल्या प्रतिकारशक्तीच्या पेशी असतात अशा जागेची सूज, स्नायू दुखणे, डोकेदुखी, ताप, पुरळ उठणे यांचा समावेश होतो.
मंकीपॉक्सचे मानव-ते-मानव संक्रमण चांगल्या प्रकारेअभ्यासले गेले आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या विषाणूचा संसर्ग मुख्यत्वेकरून मोठ्या प्रमाणावर विषाणूच्या परिणामी जखम झालेल्या लोकांच्या त्वचेद्वारे इतर व्यक्तींमध्ये पसरतो. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या तोंडात दीर्घकाळपर्यंत जखमा झालेल्या असतील आणि अशा व्यक्तीच्या श्वसनाच्या थेंबाद्वारे देखील विषाणू इतर व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करू शकतो. तुटलेली त्वचा (जरी दिसत नसला तरीही), श्वसनमार्गातून किंवा श्लेष्मल त्वचा (डोळे, नाक किंवा तोंड) द्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. व्यक्ती-ते-व्यक्ती या विषाणूचा संसर्ग होणे असामान्य आहे, परंतु खालील घटकांद्वारे याचा संसर्ग होऊ शकतो; संक्रमित व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा तागाचे (जसे की बेडिंग किंवा टॉवेल) संपर्क, मंकीपॉक्स संसर्गित व्यक्तीच्या त्वचेच्या जखमा किंवा स्कॅब्सचा थेट संपर्क, मंकीपॉक्स संसर्गित रुग्णाच्या शरीरावर पुरळ असलेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंकणे.
या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांत रुग्णाला ताप येतो. ताप दिसू लागल्यानंतर १ ते ५ दिवसांच्या आत पुरळ उठते. बहुतेकदा याची सुरुवात चेह-यापासून होते आणि नंतर शरीराच्या इतर भागात पसरते. पुरळ बदलते आणि शेवटी स्कॅब तयार होण्याआधी वेगवेगळ्या टप्प्यांतून जाते जे नंतर पडते. मंकीपॉक्सचे निदान कठीण असू शकते आणि ते सहसा चिकनपॉक्स (कांजिण्या) सारखे भासते. मंकीपॉक्सचे निश्चित निदान करण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांकडून मूल्यांकन आणि तज्ज्ञ प्रयोगशाळेत विशिष्ट चाचणी आवश्यक असते. मंकीपॉक्स उपचार आणि लसी मंकीपॉक्सचा उपचार प्रामुख्याने आश्वासक असतो. हा आजार सामान्यत: सौम्य असतो आणि संसर्ग झालेल्यांपैकी बहुतेक रुग्ण उपचाराशिवाय काही आठवड्यांत बरे होतात. मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मॉलपॉक्स लस, सिडोफोव्हिर आणि टेकोविरिमेटचा वापर केला जाऊ शकतो.
स्मॉलपॉक्सविरुद्ध लसीकरणाचा उपयोग हा संसर्ग होण्यापूर्वी किंवा संसर्ग झाल्यानंतर पण दोन्हीसाठी केला जाऊ शकतो आणि ही लस मंकीपॉक्स रोखण्यासाठी ८५ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. लहानपणी स्मॉलपॉक्सविरुद्ध लसीकरण केलेल्या लोकांना सौम्य रोगाचा अनुभव येऊ शकतो. ब्रिन्सीडोफोव्हिर आणि टेकोविरीमॅट या दोन तोंडी औषधांना स्मॉलपॉक्सच्या उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि याच औषधांनी प्राण्यांमध्ये मंकीपॉक्सच्या विरुद्ध परिणामकारकता दर्शविली आहे. शास्त्रज्ञांना मंकीपॉक्ससाठी संभाव्य अँटीव्हायरल उपचार सापडले आहेत. इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या एका समूहाने नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार ज्या रुग्णावर स्मपॉक्ससाठी डिझाईन केलेल्या दोन अँटीव्हायरलपैकी एकाने उपचार केल्यावर लक्षणे कमी झाली होती. या शास्त्रज्ञांच्या मते, या रोगाचा कोविडपेक्षा खूपच कमी धोका आहे. एक लस, खठठएडरळट (ज्याला के५ें४ल्ली किंवा के५ंल्ली७ देखील म्हणतात), मंकीपॉक्स आणि स्मॉलपॉक्स टाळण्यासाठी अमेरिकेत परवानगी देण्यात आली आहे. मंकीपॉक्सचा विषाणू स्मॉलपॉक्सला कारणीभूत असलेल्या विषाणूशी जवळचा संबंध असल्याने, स्मालपॉक्स लस देखील लोकांना मंकीपॉक्स होण्यापासून वाचवू शकते.
जागतिक परिस्थिती
आतापर्यंत २० देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स आणि इटलीमध्ये संक्रमणाची पुष्टी झाली आहे. सध्या या विषाणूमुळे संसर्गित झालेल्या लोकांची संख्या वाढत असून, मुख्यत्वेकरून युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि काही अरेबियन देशांमध्ये याचा संसर्ग दिसून आला आहे. आफ्रिकेबाहेर आता या मंकीपॉक्स रुग्णांची २३७ संशयित प्रकरणे समोर आली आहेत आणि जगभरातील आरोग्य अधिका-यांनी विषाणूंवर नियंत्रण ठेवण्याची योजना जाहीर केली आहे. जर्मन देशातील आरोग्य अधिका-यांचे म्हणणे आहे की, त्यांनी इम्व्हॅनेक्स लसीच्या ४०,००० डोसची ऑर्डर दिली आहे – जी याआधी स्मालपॉक्सवरती उपचार करण्यासाठी वापरली जाते, परंतु हीच लस मंकीपॉक्सवर देखील प्रभावी आहे.
फ्रान्समध्ये या संसर्गाची तीन प्रकरणे आढळली आहेत, फ्रान्स सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच वृद्ध आणि प्रौढांसाठी लक्ष्यित लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. तिथले अधिकारी अशी शिफारस करतात की लस संसर्गाच्या चार दिवसांच्या आत द्यावी, परंतु आवश्यक असल्यास १४ दिवसांपर्यंत दिली तरी चालते. इंग्लंडमध्ये, अधिका-यांनी नुकतेच जाहीर केले की व्हायरसची आणखी १४ प्रकरणे आढळून आली आहेत. यामुळे यूकेमध्ये एकूण प्रकरणांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. मंकीपॉक्स सहसा मध्य किंवा पश्चिम आफ्रिकेच्या प्रवासाशी संबंधित आहे, परंतु या काही देशांमध्ये सापडलेल्या रुग्णांंनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केला नव्हता, याचाच अर्थ काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येत आहे. भारतामध्ये सध्या या विषाणूमुळे संसर्ग झालेला एकही रुग्ण नसून आपण घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र सरकारी आरोग्य यंत्रणेने इतर देशांमधील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे.