24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeविशेषसॅनीटायझर लावू कुठे-कुठे ?

सॅनीटायझर लावू कुठे-कुठे ?

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी मुलं पेन, पेन्सिल तोंडात घालतात. अंगठा चघळतात. एवढेच काय कपडेसुद्धा तोंडात घालतात. म्हणून म्हणतो सॅनिटायझर लावू कुठे-कुठे? किती वेळा? शंभर मुलात एकच मुतारी चार पाण्याचे ग्लास त्याची वडा वडी एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारी पोर, आनंदाने एकमेकाला टाळ्या देणारी मुलं, एकमेकांच्या कानात बोलणारी, मिळून मिसळून राहणारी़ पेन्सिल, पेन, वही, पुस्तक, पट्टी, पाण्याचा ग्लास, पाणी बॉटल, कंपास पेटी, एक ना आनेक गोष्टींची देवाण-घेवाण सातत्याने करत असतात़ म्हणून म्हणतो सॅनिटायझर लावू कुठे कुठे आणि दिवसातून किती वेळा? हाच प्रश्न सतत सतावतो आहे, भेडसावतोय.

वाटतयं भारताची भावी पिढी आपण बोलाऊन मृत्यूच्या दाढेत तर देत नाही ना? खूप विचार केला नंतर वाटतं अरे चिमुकली, कोवळी, निरागस लेकरं चार भिंतीच्या आत कोंडून कोरोना सारख्या महाभयंकर राक्षसाच्या दाढेत देण्यापेक्षा ती दोन-तीन महिने आपल्या घरात सुरक्षित राहीली तर जिंदगीभर आनंदात, सुखात राहतील. देशाच्या भवितव्याचा विचार करता आज तरी असं वाटतं की इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत छोटीज्ञ-छोटी मुले आपापल्या घरी सुरक्षित राहिली तरच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून मुलांचं जगणं महत्त्वाचं आहे.

आज उत्तर सोलापूर तालुक्यातील एका शिक्षकाला कोरोणाची लागण झाली. शाळा बंद असून अशा घटना घडत आहेत. उद्या शाळा सुरु झाल्यावर एक काय शेकडो शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांना कोरोना नावाचा महाभयंकर राक्षस कवेत घेईल, याची मनाला खूप भीती वाटते आणि पुन्हा वाटते खरच आत्ताच शाळा सुरु करण्याची गरजच आहे का? तेव्हा मन म्हणतं ‘नाही’़ शाळा सुरु करण्याची अजिबात गडबड करु नये.

ही वेळ शाळा शिकवण्याची नसून विद्यार्थ्यांना जिवंत कसे राहावे हे शिकवण्याची आहे़ कालपर्यंत आठ-दहा माणसांना जमावबंदीचा आदेश देणार शासन आज शेकडो विद्यार्थ्यांना एकत्र का बोलावतय हेच कळत नाही़ हे लोक शाळा सुरु करतील़ भरमसाठ फिस गोळा करतील आणि पुन्हा कोरोना वाढला म्हणून सुट्टी देतील. मध काढला की पोळी फेकून देतील यात शंका नाही़ मुलं जगली तर शिकतील म्हणून मुलं वाचवा देशाचं भविष्­य वाचवा

Read More  रेणापूर तालुक्यासाठी २५० टन खत उपलब्ध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या