21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home विशेष पाऊस असा का पडतोय?

पाऊस असा का पडतोय?

एकमत ऑनलाईन

जागतिक हवामान बदलांचा परिणाम मान्सूनवर होत असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी-शास्त्रज्ञांनी मागील काळात मांडले होते. तथापि, त्यावेळी पावसात फार मोठ्या प्रमाणावर बदल दिसून न आल्याने याकडे दुर्लक्ष केले गेले. आता मात्र ते प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. पावसाचे दिवस कमी झाले आहेत. कमी काळात तीव्र पाऊस पडू लागला आहे. ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा सर्व हवामान बदलांचा म्हणजेच जागतिक तापमानवाढीचा परिपाक आहे.

राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवडाभरा पासून सुरू असलेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे प्रचंड दैना उडाली आहे. पुणे, मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण, दक्षिण मराठवाडा, विदर्भ आदी सर्वच भागात गडगडाटासह पडणा-या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून कृषिक्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतातील उभी पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच तेलंगणामध्येही जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

वास्तविक, आपल्याकडे जून ते सप्टेंबर हा काळ मान्सूनचा असतो. आपल्याकडे मान्सूनच्या १८७० पासूनच्या जवळपास दीडशे वर्षांच्या नोंदी उपलब्ध आहेत. मान्सूनच्या हंगामात देशभरात एकूण ८४ सेंमी पाऊस पडतो. त्यात दहा टक्के मागे-पुढे होऊ शकते. म्हणजे ७५ ते ९५ सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये एकूण मान्सूनपैकी ७० टक्के पाऊस पडतो. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडतो; पण त्याचे प्रमाण कमी असायचे. गेल्या काही वर्षांत मात्र त्यात वाढ झालेली दिसते. १९८० नंतरच्या पावसाचा अभ्यास करून सायरोका आणि तोऊमी यांनी मांडलेल्या निष्कर्षांनुसार ऑक्टोबर महिन्यात पडणा-या पावसामध्ये ३.१ टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली आहे.

ही वाढ प्रामुख्याने बंगालचा उपसागर, दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मध्य भारत, विशेषत: पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिणेकडील द्विपकल्पात दिसून आली आहे. आकाशवाणीच्या उपविभागीय आकडेवारीचे विश्लेषण करता असे दिसून येते की, भारतात द्वीपकल्पीय भागात आणि पश्चिम किनारपट्टीवर या पावसाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. दरवर्षी ऑक्टोबरपासून ईशान्य मोसमी पावसाची सुरुवात होते. हा पाऊस आंध्र प्रदेशचा तटीय भाग, केरळ, तामिळनाडू या भागात अधिक प्रमाणात पडतो. आपल्याकडे त्याचे वितरण फारसे नसते. पण यंदा परतीचा पाऊस आणि ईशान्य मान्सून यांचे एकत्रीकरण झालेले दिसत आहे.

विठ्ठल मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक फुलांची सजावट

जुलै-ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरात उत्तर भागात – ज्याला हेड बे ऑफ बंगाल असे म्हटले जाते – कमी दाबाची विवरे किंवा कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात आणि ते मध्य प्रदेशातून पश्चिमेकडे प्रवास करत असतात. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरावर दक्षिणेकडे म्हणजे आंध्रच्या किना-याकडे सरकले आहे. नोव्हेंबरमध्ये ते तामिळनाडूकडे सरकते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हाच काळ
चक्रीवादळे तयार होण्याचाही असतो. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळांत होते. अशी चक्रीवादळे आंध्रच्या किना-याला धडकत असतात. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे थोडाफार पाऊस पडायचा.

चक्रीवादळ एक-दोन दिवसांत विरून जाते आणि त्याचा परिणाम काही भागात सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडतो. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास सोसाट्याचा वारा नसतो; पण पाऊस विस्तृत प्रमाणात पडतो. आताच्या मुसळधार पावसाचे प्रमुख कारणही बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र हेच आहे. १२ ऑक्टोबर रोजी आंध्रच्या किना-यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि तिथून त्याने पश्चिमेकडे प्रवास सुरू केला. हैदराबाद, सोलापूर, नांदेड, उमरगा, लातूर, कोल्हापूर, सांगली या भागात पावसाचा तडाखा देत अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेले आहे. असे असले तरी आता ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात पाऊस पडतो आहे तो असामान्य आहे.

वास्तविक, कमी दाबाचे क्षेत्र हे जमिनीवर आल्यावर त्याला बाष्पाचा पुरवठा होत नसल्याने ते काही काळातच विरून जाते. पण, गेल्या ३ महिन्यांत भरपूर पाऊस झाल्याने जमिनीत भरपूर ओलावा आहे. त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राला आवश्यक बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यातूनच त्याचा प्रवास अरबी समुद्रापर्यंत होणार आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर १९७७ रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती. चेन्नईजवळील नागापट्टणम येथे चक्रीवादळाने जमिनीवर प्रवेश केला व ते केरळला अरबी समुद्रात जाऊन मिळाले. तेथे त्याला अरबी समुद्रातून पुन्हा बाष्प मिळाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढून ते उलट फिरले. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर तेव्हा मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळचे चक्रीवादळ होते. आताचे कमी दाबाचे क्षेत्र आहे. असे कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे शेतकरी आजवरच्या ऋतुचक्रानुसार पिकांची कापणी, साठवणूक, पेरणी या सर्वांची आखणी करत असतात. पण अचानकपणाने कमी दाबाचे पट्टे तयार होऊन पडणा-या या मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. तथापि, याची आता आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण येणा-या काळात अशा घटना घडतच राहणार आहेत.

वेबसिरीजमधील अश्लीलता

याचे मुख्य कारण आहे हवामान बदल. हवामान बदलाची चर्चा साधारणपणे १९८० च्या दशकात सुरू झाली. त्यावेळेस ही एक शास्त्रीय कल्पना आहे, असे समजून ही गोष्ट लोकांनी गांभीर्याने घेतली नाही. पण आता हवामान बदलाचे चटके सर्वसामान्यांना बसायला लागले आहेत. या तापमानवाढीचा परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसू लागला आहे. असेच तापमान वाढत राहिले तर त्याचा परिणाम पावसाचे जलचक्र, अन्नधान्य, धरणातील पाण्याचे साठे, समुद्राच्या पाण्याची पातळी, हिमनद्या, धु्रवावरील बर्फाचे आवरण, हवेतील बॅक्टेरिया इ. घटकांवर कसा आणि किती होईल याची चिंता शास्त्रज्ञांना लागली होती. अनेक अभ्यासकांनी, हवामानशास्त्रज्ञांनी या हवामान बदलांचा परिणाम मान्सूनवर होत असल्याचे मत मांडले होते. तथापि, त्यावेळी पावसात फार मोठ्या प्रमाणावर बदल दिसून न आल्याने याकडे दुर्लक्ष केले गेले. आता मात्र ते प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. विशेषत: गेल्या दोन वर्षांत आपण स्पष्टपणाने ते अनुभवत आहोत. हवेचे तापमान वाढले की हवेची बाष्प ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे ढगांची निर्मिती अधिक होते आणि पर्यायाने पाऊसही अधिक पडतो.

गेल्या काही वर्षांत जून ते सप्टेंबर या काळातील पर्जन्यमान पाहिल्यास त्यात फारसा बदल झालेला नाही. मात्र वितरणातील असमानता वाढली आहे. तसेच मान्सूनचे वर्तन बदलले आहे. पावसाचे दिवस कमी होत आहेत. कमी काळात अधिक तीव्रतेने पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. वादळी वा-यांसह पाऊस पडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे पूर येणे, जमिनीची धूप होणे, जमिनीत पाणी न मुरता ते वाहून जाणे हे सारे घडताना दिसत आहे. याचाच अर्थ ज्याला हवामानशास्त्रातील ‘एक्स्ट्रीम इव्हेंट्स’ म्हणतात, ते वाढले आहेत. हा बदल सिद्ध झाला असून त्याबद्दल काही संशोधन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. साहजिकच याचा परिणाम समाजजीवनावर आणि शेतीवर पडू लागला आहे. त्यामुळे आता ‘स्मार्ट अ‍ॅग्रिकल्चर’बाबत प्राधान्याने विचार करणे आवश्यक बनले आहे. आजवर तापमानवाढ हे नैसर्गिक चक्र आहे, कधी तापमान वाढते तर कधी कमी होते, त्यामुळे सध्याची तापमानवाढ भविष्यात आपोआपही कमी होईल, असा विचारप्रवाह होता; पण वेगवेगळ्या अभ्यासांतून हा विचार चुकीचा असल्याचे सिद्ध झालेले आहे. तापमानवाढ अशीच अनियंत्रित राहिली तर येत्या काळात निश्चितपणाने गंभीर धोके उद्भवणार आहेत, हेही अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच तापमानवाढ कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबतची कटिबद्धता संपूर्ण जगाने दाखवण्याची गरज आहे. अन्यथा, अशा आक्रितांचा सामना अटळ आहे.

-डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

काळ सोकावता कामा नये!

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक कलाकारांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये जो हलकल्लोळ सबंध देशभरात उडालेला दिसून आला...

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत भारताचा संघर्ष सुरू असतानाच स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या एका पाठोपाठ एक चाचण्या करून भारत आपल्या क्षेपणास्त्रशक्तीचा स्पष्ट अंदाज जगाला देत...

गरज शाश्वत आर्थिक संरक्षणाची

जागतिक हवामान बदलांचे आणि तापमानवाढीचे दृश्य बदल अलीकडील काळात सातत्याने अनुभवास येत आहेत. विशेषत: याचा पर्जन्यमानावर झालेला बदल दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत आहे....

ओंगळवाणा चेहरा

मुलींना आपले विचार मुक्तपणे मांडता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांपासून उपयुक्त मंच ठरत आहे. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच या आभासी जगातही त्यांना अवमान...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...