24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeविशेषहोमिओपॅथीचा दुस्वास का?

होमिओपॅथीचा दुस्वास का?

एकमत ऑनलाईन

होमिओपॅथी आज जवळजवळ २०० वर्षांपासून साºया जगात वापरली जाणारी पध्दती आहे. ती तेवढी निरुपयोगी व घातक असती तर अनेक प्रथा, परंपरा, समज जसे कालाच्या ओघात नाहीशा झाल्या तशी कधीच लोप पावली असती. कुठल्याही राज्य, अर्थ व बाजारव्यवस्थेचा पाठिंबा नसताना ती टिकून आहे, एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन अशा तथाकथित प्रगत देशांत वापरलीही जाते आहे. अशा होमिओपॅथीला बोगस म्हणणारे वावदूक समाजात आहेत. त्यात त्यांचा दोष नाही. त्यांच्या आकलन क्षमता व आजवरच्या त्यांच्या जनुकीय स्मृतिकोषातील साठवलेल्या माहितीचा अभाव त्याला कारणीभूत आहे. होमिओपॅथी ही वैद्यकीय क्षेत्रातील सिंड्रेला आहे व तिचे मूल्यमापन होईपर्यंत आपल्याला हा दुस्वास सहन करणे भाग आहे.

होमिओपॅथीबद्दल व्यक्त होणारी निरनिराळी मते हे काही नवे नाही. जगात असे अनेक विषय आहेत की त्यांच्यावर अजूनही एकमत झालेले नाही व होऊही शकणार नाही. म्हणून ते विषयच आपल्या अनुभव विश्वातून बाद करता येत नाहीत. धर्माच्या नावाने आपले जीवन अर्पून पोटाला बाँब बांधणारे जेवढे आहेत तेवढेच धर्म नाकारून आपल्या स्वेच्छेने जगणारे दाखवता येतील. युध्दाच्या बाबतीतही अशीच टोकाची मते दिसून येतात. खाणेपिणे सोडून क्रिकेट बघणारे जेवढे आहेत तेवढेच रिकामटेकड्यांचा खेळ म्हणून न पाहणारेही आहेत.

ज्यांना शास्त्रीय संगीत आवडते त्यांचा ते इतरांनाही तेवढेच आवडावे असा आग्रह नसतो पण ते आपल्या अनुभव विश्वाशी प्रामाणिक राहत रसास्वाद घेत राहतात.आपली मते ठरवणारे अनेक विषय ज्यात संगीत, कला, खाद्य, साहित्य, खेळ, राजकारण दाखवता येतील त्यात अनेक विरोधाभासी मते मांडली जातात. शेवटी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. होमिओपॅथी ही व्यक्तिविशेषावर आधारलेली उपचार पद्धती आहे व ज्या व्यक्ती त्या पातळीवर प्रतिसाद देऊ शकतात अशा उत्क्रांत घटकांसाठीच लागू पडते. शेवटी प्रत्येक मानवच नव्हे तर प्राण्यांमध्येही अशा विविध पातळ्या दिसून येतात. मानवाचे गुणधर्म असलेला प्राणी त्याच्या उत्क्रांतीच्या पातळीनुसार विभागता येतो. मला ताप येतो म्हणून मांत्रिकाकडे जाणारे ते अद्ययावत तपासण्या करून घेणारे हे आपापल्या स्मृतिकोषानुसार त्या त्या ठिकाणी योग्य असतात व ते बरेही होतात. यात काही योगायोग नसतो, तो आकलनाच्या परिस्थिती, शक्यता व उपलब्धता यानुसार ठरत असतो.

Read More  रेमडेसिवीरचा संपूर्ण स्टॉक अमेरिकेनेच घेतला

होमिओपॅथी आज जवळजवळ २०० वर्षांपासून सा-या जगात वापरली जाणारी पध्दती आहे. ती तेवढी निरुपयोगी व घातक असती तर अनेक प्रथा, परंपरा, समज जसे कालाच्या ओघात नाहीशा झाल्या तशी कधीच लोप पावली असती. शिवाय कुठल्याही राज्य, अर्थ व बाजारव्यवस्थेचा पाठिंबा नसताना ती अजूनही टिकून आहे, एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन अशा तथाकथित प्रगत देशांत वापरलीही जाते हे लक्षात घेतले पाहिजे. भारतासह विविध देशांनी आपल्या आरोग्य व शिक्षण कार्यक्रमात होमिओपॅथीचा अंतर्भाव केला असून कॉलेजेस व हॉस्पिटल्स यांचा त्यात समावेश होतो. तिला नाकारताना या साºया व्यवस्थांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उभे करता येईल.

कोरोना जसे सर्वांना सरसकटपणे एकाचवेळी बाधित करीत नाही कारण त्याचेही काही निकष असावेत; तसेच होमिओपॅथीही तापाच्या गोळीसारखी सर्वांना सरसकटपणे वापरता येईल हे शक्य नाही. कारण मुळातच आजाराची कल्पना, शरीराची जडणघडण व कार्यपध्दती याच्या बाबतीत अनेक मतांतरे आहेत. एक पध्दती जंतूंना मारून रोग बरे करते, तर या जंतूंना उपसर्गच पोहोचवता येऊ नये असे वातावरण शरीरात निर्माण करणे ही दुसरी पद्धत असू शकते. एका कॉलराच्या साथीत एका डॉक्टरने कॉलराचे जंतू असलेले पाणी जाहीररीत्या पिऊनही त्याला काहीच न झाल्याचे सिद्ध केल्याचे उदाहरण आहे. लहान मुलांना अचानक भीतीचा धसका बसला तर त्याला गळू होते हा मन व शरीराचा संबंध आज कोणता अ‍ॅलोपॅथ मान्य करील?

खरे म्हणजे हा वैद्यकीय युक्तापायुक्ततेचा प्रश्न नसून अर्थकारणाचा आहे. एक मोठी लॉबी यात कार्यरत असून काही माहिती शास्त्रीय पुरावे देत संभ्रमाचे वातावरण तयार करीत असते. निसर्ग संकेतापासून अगोदरच दूर गेलेल्या या पिढीला अशा खोट्या शास्त्रीयतेची भुरळ पडते व ते त्याला बळी पडतात. आधुनिकतेचा बुरखा घेऊन आलेल्या साºया गोष्टी चांगल्या असतात हा जनप्रवाद झाला आहे. याचे चांगले उदाहरण साखरेचे देता येईल. विल्यम डफ्ती या अमेरिकन पत्रकाराने यावर संशोधन केले आहे. साखरेच्या उगमापासून ती गांजा, चरस या वर्गातील असून देखील तिचा होणारा वाढता वापर, त्यातील अर्थकारण, राज्यांना कर लावून त्यातून मिळणा-या कराचे प्रमाण हे सारे बघता आज सारे जग साखरेचे व्यसनाधीन झाले आहे व त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत.

Read More  लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट तब्बल ३४ रुग्ण पॉजिटीव्ह

या संशोधनाला अमेरिकेतील पत्रकारितेतील सर्वौच्च पारितोषिक मिळूनही आज किती डॉक्टरांना हे संशोधन माहीत आहे ? माहीत नसल्याचे कारण केवळ त्यात आपल्या हिताचे अर्थकारण नसणे हे आहे. आजही कोरोनाच्या गंभीर संकटात ही औषध लॉबी ज्या पध्दतीने आपले आर्थिक स्वार्थ पुढे रेटते आहे ते मानवजातीच्या दृष्टीने किळसवाणे असले तरी सरकारसह कोणी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही.

होमिओपॅथीला बोगस म्हणणारे वावदूक यांचा त्यात काही दोष नाही. त्यांच्या आकलन क्षमता व आजवरच्या त्यांच्या जनुकीय स्मृतिकोषातील साठवलेल्या माहितीचा अभाव त्याला कारणीभूत आहे व ते त्या अनुभवातून जाईपर्यंत ते केवळ बिचारे आहेत म्हणून त्यांना माफ करावे लागेल. मी आज चाळीस वर्षांपासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करीत आहे व माझ्यासारखे अनेक डॉक्टर देशातच नव्हे तर साºया जगात कुठलीही तक्रार नसताना कार्यरत आहेत. माझा एक उद्योगपती पेशंट अमेरिकेत छातीत कळ येऊन तिथल्या अद्ययावत रुग्णालयातील डॉक्टरांचे मत ऐकून मी माझ्या भारतातील डॉक्टरांना अहवाल दाखवतो म्हणून उपचार न घेता परत आला व केवळ माझ्या उपचारांनी बरा झाला. अशी चमत्कार वाटावी अशी अनेक उदाहरणे देता येतील. अनेक रुग्णही अशी उदाहरणे देऊ शकतात. माझ्या मते होमिओपॅथी ही वैद्यकीय क्षेत्रातील सिंड्रेला आहे व तिचे मूल्यमापन होईपर्यंत आपल्याला हा दुस्वास सहन करणे भाग आहे.

डॉ. गिरधर पाटील

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या