20.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला अजून किती वेळ लागेल, कोणालाही सांगता येणार नाही. या संकटाचा सामना प्रत्येक राज्य आपापल्यापरीने करीत आहे. लोकसंख्येच्या घनतेमुळे महाराष्ट्र त्यातही मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरांना अधिक फटका बसला आहे. या संकटातून महाराष्ट्र नक्की बाहेर पडेल. एखाद्या कुटुंबावर एक आपत्ती आली तरी त्यातून बाहेर पडताना कुटुंबातील सर्वांचा जीव मेटाकुटीला येतो. घरातल्या एखाद्या कर्त्या पुरुषाला हृदयविकाराचा तीव्र झटका यावा, त्यातून ते घर सावरते न सावरते तोच घरातल्याच सदस्याला मोठा अपघात व्हावा तशी महाराष्ट्राची आज स्थिती झाली आहे.

कोरोना संकटकाळात निसर्गाने दोन प्रचंड झटके महाराष्ट्राला दिले. ‘‘परतीचा पाऊस, परतीचा पाऊस’’ असे म्हणता पावसाची सवय असलेल्या कोकणाला दोन महिन्यांपूर्वी ‘फयान’ या वादळाने झोडपून टाकले. प्रचंड वारा, पाऊस, विजा, नद्यांचा पूर आणि सगळ्या कोकणात हाहाकार!, किती घरे पडली, कोकणातल्या किती बागा उद्ध्वस्त झाल्या, त्याचा हिशेब ठेवता येणार नाही, एवढे नुकसान झाले. वादळाचे महाप्रताप चार दिवस दाखवण्यात येत होते. समाजमाध्यमांपुढे कोसळती घरे, चारी बाजूंनी कोंडी झालेली माणसं हे सर्व काही घरात बसून अस पणे पहात होती. कोणतेही संकट कायम टिकत नसते. महापूर असो, वादळ असो, काही वेळाने ते ओसरतेच. कोरोना साथ थोडी जास्त टिकली आहे. त्याला अनेकांच्या चुका कारणीभूत आहेत. त्याची चर्चा न करता आलेल्या संकटांवर मात करून त्यातून उभे रहायचे, हा महाराष्ट्राने आत्मसात केलेला एक गुणविशेष आहे.

‘परतीचा पाऊस’ या नावाने पुन्हा एकदा ढगफुटीच्या भयानक पावसाने सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांची वाताहात करून टाकली. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील शेतीला फार मोठा तडाखा बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण पावसाळ्यात म्हणजे चार महिन्यांत १५ इंच पाऊस पडतो. त्या जिल्ह्यात एका दिवसात १९३६ मि.मी. म्हणजे साधारणपणे ७६ इंच आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जवळजवळ १० इंच पाऊस कोसळलाय. सोलापूरच्या इतिहासात एवढा पाऊस नाही असे सांगतात. ‘अक्कलकोट’ हा दुष्काळी तालुका मानला जातो. या जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर शेती बर्बाद झाली. पिकांचे नुकसान प्रचंड आहे. पण या भयानक संकटात केवळ निसर्ग नव्हे तर उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग एकाच दिवशी करणारे अधिकारी जबाबदार आहेत.

पुढील काही महिने धोक्याचे – डब्ल्यूएचओ इशारा

उजनी धरणाच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या अभियंत्याने हवामान खात्याच्या अंदाजानंतर धरणातील पाणी हळूहळू सोडायला हवे होते. १११ टक्के भरलेल्या उजनी धरणाचे पाणी १४ ऑक्टोबरला या कंत्राटी अभियंत्याने प्रचंड प्रमाणात सोडले आणि पंढरपूर पाण्यात बुडाले. पाटबंधारे विभागाचा कोणताही कार्यकारी अभियंता येथे अधिकृतपणे नियुक्त नाही. एका अभियंत्याची बदली करून घेतल्यानंतर उजनी धरणासाठी कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती झालेली नाही. धरणाचा अवाका इतका मोठा आहे की, उजनीचा ‘यशवंत सागर’ जलाशय कोणत्याही अधिकृत अधिका-याविना आज आहे. ३८ लाख लोकसंख्येला हे धरण पाणी पुरवते. या धरणाचे एकूण कालवे ४६३ किलोमीटर आहेत. १५०० चौैरस किलोमीटर जलाशयाचा विस्तार आहे. ३ लाख हेक्टर जमीन या पाण्यावर भिजते, २० किलोमीटर लांबीचा बोगदा असा प्रचंड पसारा असलेला हा जलाशय कंत्राटी अधिका-याच्या भरवशावर सोडलेला आहे. केवळ पांडुरंगाच्या कृपेनेच पंढरपूर वाचले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने दौरा केला हे चांगले झाले, शेतक-यांना मदत पण उजनी धरणाबद्दल बेफिकीर असणा-या संबंधितांवर काय कारवाई होणार? या महाकाय धरणासाठी पाटबंधारे खात्याचा अधिकृत नियुक्त अभियंता का नाही? कंत्राटी अभियंता कशाला? अख्खे पंढरपूर वाहून गेले असते तर पानशेतपेक्षा जास्त भयानक झाले असते याची चर्चाच होत नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची गांभीर्याने चौकशी करावी. या प्रचंड हानीनंतर महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ नेते शरद पवार नेहमीप्रमाणे पहिल्या प्रथम शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या नेत्यांनी गावागावांत जाऊन झालेले नुकसान डोळ्यांनी बघितले. काहींना तातडीने मदत दिली.

पंचनामे झाल्यावर उरलेली मदत देऊ असे सांगितले, ते फारसं खरं नाही. पंचनामे करणारी यंत्रणा फार तोकडी आहे. ही यंत्रणा गावागावांत पोहोचणे अवघड आहे. त्यांचा अहवाल तयार होणार, तो मामलेदाराकडे जाणार, तिथून कलेक्टर अशी या प्रस्तावाची वरात फिरल्यावर मदतीचा प्रस्ताव तयार होणार… त्यामुळे पुढच्या मदतीच्या गोष्टी फार अवघड आहेत. गेल्या ५०-६० वर्षांचा अनुभव सर्वांनाच आहे. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे उध्दवसाहेब, पवारसाहेब स्वत: शेताच्या बांधापर्यंत पोहोचले. जनतेबद्दल संवेदना असलेले हे नेते आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे, सर्वांना मदत देणे फार अवघड आहे आणि कोणतेही सरकार ती मदत प्रत्येक घरापर्यंत देऊ शकणार नाही. या राज्याचे ३० हजार कोटी रुपये एवढी मोठी हक्काची येऊ असणारी रक्कम केंद्र सरकारने थकवलेली आहे. ती रक्कम महाराष्ट्राला केंद्र सरकार देणं असताना दिली जात नाही. एवढ्या प्रचंड हानीनंतर पंतप्रधानांना महाराष्ट्रात यायला वेळ नाही, त्यांच्याकडून आर्थिक मदत नाही.

पुढील काही महिने धोक्याचे – डब्ल्यूएचओ इशारा

मदत देऊ नका पण, महाराष्ट्राचे येणे असलेले हक्काचे पैसे तरी द्या. उध्दव ठाकरे बरोबर बोलले आहेत, ‘आमची येणं रक्कम द्या, मदत देऊ नका’ पण जिथं केंद्र सरकारच रिझर्व्ह बँकेची वरकड असलेली रक्कम- ५४ हजार कोटी रुपये स्वत:च्या खर्चासाठी परस्पर वळवून घेते. केंद्र सरकार भिकेला लागलेले आहे. राज्याला कुठून मदत करणार? आर्थिक संकट यांच्याच निर्णयातून देशावर आले. विमानतळ विकून टाक, कंपन्या विकून टाक, सगळं काही विकायला काढलेलं. हे केंद्रातले लोक महाराष्ट्राला काहीही आर्थिक मदत देणार नाहीत. जिथे भाजपचे राज्य नाही, ते राज्य त्यांच्यादृष्टीने वाळीत टाकल्यासारखे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्राकडून कसलीही अपेक्षा बाळगू नये. केंद्र सरकार मदत करणार नाही. उलट फडणवीसांसारखे केंद्राच्याच टोळीतील काही म्होरके महाराष्ट्राची फजिती कशी होते, हे बघत बसतील. पाच वर्षांच्या सत्तेत यांनी काहीही केलेलं नाही.

यांचे घोटाळे ‘कॅग’ने उघड केले असे हे माजी मुख्यमंत्री आणि ते आजचे विरोधी पक्षनेते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना ‘भाडे’ थकवले म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांना कोर्टाची नोटीस येते, ते आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैवाने राज्यपाल. तेव्हा महाराष्ट्रावरचं संकट केवळ कोरोना, केवळ निसर्गकोप एवढ्यापुरतंच नाही. मोदी सरकार हेही महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात मोठी अडचण ठरणार आहे. राष्ट्रपती राजवट आणण्याची हिंमत होत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राचे हे ‘महाआघाडी राज्य’ सलत आहे. ३० हजार कोटी रुपये थकविण्याचे कारण तेच आहे. आर्थिक कोंडी करून महाराष्ट्राला एकीकडे खिंडीत गाठायचे, शेतकरी विरोधातले केंद्रातले कायदे महाआघाडी सरकार राबवत नाही म्हणून राजकीय कोंडी करायची, हाच यांचा डाव आहे. हे सर्व महाराष्ट्र पुरेपूर ओळखून आहे.

सर्व संकटात महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहील. महाआघाडीचे सरकार महाराष्ट्राला पुन्हा मार्गी लावेल. जर चुकून केंद्र सरकारला ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ होऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न झाला तर त्यानंतरच्या होणा-या निवडणुकीत १०५ वरून फडणवीस टोळीचा आकडा ५० वर येईल हे लिहून ठेवा. सध्यातरी उध्दव सरकारला केंद्राच्या मदतीशिवाय सर्व संकटांचा सामना करायचा आहे. या संकट काळात महाराष्ट्रातील लोक ‘महा-राष्ट्र’ हे नाव सार्थ करतील. एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे. नुकसान झालेल्या प्रत्येकाला भरपाई देणे कोणत्याही सरकारला शक्य नाही हे समजून घेऊन महाराष्ट्रात उभे राहायचे आहे.

-मधुकर भावे

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...