21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडाआथिया-के. एल. राहुल लग्न करणार?

आथिया-के. एल. राहुल लग्न करणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल हे येत्या तीन महिन्यांत लग्न करत आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. शिवाय असेही समोर आले आहे की दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नावर अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी याने मोठा खुलासा केला आहे.

मुंबईमध्ये अथिया आणि राहुल यांच्या घरचे एकमेकांना भेटले. त्यावेळी त्यांच्यात या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा झाली. इतकेच नाही तर दोघांच्याही घरची मंडळी त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी गेले होते. याच बातमीत असे नमूद केले होते की, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अथिया आणि राहुल येत्या तीन महिन्यांत लग्न करू शकतात. त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

काय म्हणाला सुनील?
दरम्यान, अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सुनील शेट्टीने एक मोठा खुलासा केला आहे. जेव्हा सुनीलला अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुनील म्हणाला की, ‘नाही. अजून त्यांच्या लग्नाचा कोणताही प्लॅन झालेला नाही.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या