27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाऋतुजा उरगुंडेची राज्­य संघात निवड

ऋतुजा उरगुंडेची राज्­य संघात निवड

एकमत ऑनलाईन

लातूर : शूटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया सलग्­न राज्­य
शूटींग बॉल असोशिएशन महाराष्­ट्रद्वारा आयोजित ३५ वी राज्­य शुटींग बॉल अजिंक्­य पद व निवड चाचणी स्­पर्धेत लातूर येथे कै. गोविंदराव गित्ते कनिष्­ठ महाविद्यालय, पानगावची ऋतुजा भिमाशंकर उरगुंडे हिची राज्­यातून निवड झाली आहे. लातूर येथे सदरील निवड चाचणी स्­पर्धा पार पडली. तीत पानगावची ऋतुजा उरगुंडे हीची राज्­यस्­तरावर शूटींग बॉल स्­पर्धेसाठी निवड झाली. ही निवड म्­हणजे पानगावच्­या नाव लौकिकात शानदार भर आहे.

ही स्­पर्धा मार्च- एप्रील २०२२ मध्­ये मध्­यप्रदेश, राजस्­थान येथे पार पडणार आहे. यासाठी तिचे शारीरिक शिक्षक नितीन उकरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीचे अंनिसचे जिल्­हा प्रधान सचिव बाबा हलकुडे, सुधीर भोसले, ग्राम बाल संरक्षण समिती पानगावचे अध्­यक्ष मधुकर गालफाडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती गालफाडे, सरपंच सुकेश भंडारे, डॉ. सुनील नागरगोजे, कुलभूषण संपत्ते, शिलाताई आचार्य, पार्वती उरगुंडे, वसंत बिराजदार, भिमाशंकर उरगुंडे, अनिता उरगुंडे, प्रकाश उरगुंडे आदींनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या