नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादचे कर्णधार केन विलियम्सन दुस-यांदा बाप बनला आहे. त्याच्या पत्नीने मुलाल जन्म दिला. ही गोड बातमी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली आहे. सध्या त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांता वर्षाव होत आहे.
विलियम्सन आयपीएल १५ सीझनमधील अखेरच्या मॅचपूर्वी म्हणजेच १८ मेला मायदेशी परतला होता. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पत्नी सारा आणि पहिले अपत्यसह नुकतंच जन्मलेलं गोंडस बाळ असा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास कॅप्शन दिली आहे.
लिटिन मॅन तुझं या जगात स्वागत आहे. अशी कॅप्शन त्याने दिली आहे. सनरायझर्स संघाचे यंदाचे कर्णधारपद विलियम्सन सांभाळत होता. दरम्यान, त्याला त्याची मायदेशी परताव लागल. त्याच्या नंतर संघाची कमान भुवनेश्वर कुमारने सांभाळली.