31.9 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडाक्रमवारीत भारत कांगारूंच्या मागेच

क्रमवारीत भारत कांगारूंच्या मागेच

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करून भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे.

तापर्यंत झालेल्या सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी ८-८ सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ३९० गुण असून ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३२२ गुण आहेत. गुणांमध्ये एवढी तफावत असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ डब्ल्यू टीसी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

काय आहे यामागचे कारण?
आयसीसीने काही दिवसांपूर्वी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणांकन पद्धतीत बदल केला आहे. स्पर्धेत सहभागी संघाची गुणतालिकेतली क्रमवारी आता त्यांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवरून ठरवली जाणार आहे. सहभागी संघाने आतापर्यंत खेळलेले सामने व त्यातून मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवरून अंतिम सामन्यात कोणता संघ खेळेल याचा निर्णय घेतला जाणार आहे.

भारतीय संघाची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतली ही पाचवी मालिका आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ५४० पैकी ३९० गुणांची कमाई केली आहे त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ही ७२.२ एवढी येते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाची ही चौथी मालिका आहे. त्यांनी आतापर्यंत ४२० पैकी ३२२ गुण मिळवले असल्यामुळे त्यांच्या गुणांची टक्केवारी ही ७६.६ एवढी आहे. याच कारणामुळे जास्त गुण मिळवूनही भारतीय संघ गुणतालिकेत दुस-या स्थानावर आहे.

रतनचंद शहा सहकारी बँक टेंभुर्णी शाखेमध्ये ५ कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या