24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडा गांगुलीची लिजेंड्स लीग मैदानातून माघार?

 गांगुलीची लिजेंड्स लीग मैदानातून माघार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली तब्बल १० वर्षांनंतर मैदानात परतणार होता, मात्र आता त्यावर ब्रेक लागला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष गांगुली यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि वेळेअभावी लिजेंड्स क्रिकेट लीगमधून माघार घेतली आहे.

खरे तर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यावर्षी १६ सप्टेंबर रोजी इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे दादा या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

वेळेच्या कमतरतेमुळे या सामन्यात खेळणार नसल्याचे बीसीसीआय अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गांगुली यांनी स्पष्ट केले की, ‘हो, मी वेळेच्या कमतरतेमुळे खेळत नाही. मी फक्त एकच चॅरिटी मॅच खेळणार होतो.’

कोलकात्यातील लोकही या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. तिकिटासाठी चुरशीची लढत झाली. याचे कारण फक्त गांगुली होता, मात्र आता चाहते दादा मैदानावर खेळताना दिसणार नाहीत. या सामन्यात सौरव गांगुली इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करणार होता. त्याच्या नेतृत्वाखाली वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंगही खेळणार होते. मात्र आता गांगुली वगळता बाकीचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या