21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडाचेतेश्वर पुजाराचा नवा विक्रम

चेतेश्वर पुजाराचा नवा विक्रम

एकमत ऑनलाईन

लंडन : चेतेश्वर पुजाराने आज एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारण आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला हा पराक्रम करता आला नव्हता. पण पुजाराने आता ही मोठी कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.

भारताचा इंग्लंडचा दौरा आटोपला आहे. पण पुजारा मात्र अजूनही इंग्लंडमध्ये आहे. पुजारा हा इंग्लंडमधील ससेक्स या कौंटी संघाकडून खेळत आहे. सध्या ससेक्स आणि मिडलसेक्स यांचा कौंटी सामना सुरू आहे. क्रिकेटची पंढरी म्हणजेच लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात पुजाराने धडाकेबाज द्विशतक झळकले आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला लॉर्डसच्या मैदानात द्विशतक झळकवता आलेले नाही. यापूर्वी भारताकडून लॉर्डसच्या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विनू मंकड यांच्या नावावर होता.

विनू मंकड यांनी इंग्लंडविरुद्ध १९ जून १९५२ साली कसोटी सामना खेळताना १८४ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर या मैदानातील दुसरी सर्वोत्तम खेळी ही दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर होती. त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळताना १५७ धावा करता आल्या होत्या. पण या मैदानात आतापर्यंत एकाही भारताच्या क्रिकेटपटूला द्विशतक झळकावता आले नव्हते. पण हा पराक्रम आता पुजाराच्या नावावर झाला आहे. पुजाराने या सामन्यात २१ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर २३१ धावांची खेळी साकारली.

पुजाराची ससेक्सच्या कर्णधारपदी निवडही करण्यात आली आहे. पुजारा हा या सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता आणि त्याने यावेळी कर्णधाराला साजेसा खेळ केला आहे. संघाच्या अखेरच्या फलंदाजाला सोबत घेऊनही तो फलंदाजी करत होता. त्याचबरोबर या डावात ससेक्सच्या संघाकडून सर्वाधिक स्ट्राइक रेटही पुजाराच्या नावावर होते. काही दिवसांपूर्वी पुजाराला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले होते. पण इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेत त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. या सामन्यात पुजाराने चांगली फलंदाजी केली होती. पण भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नव्हता आणि त्यामुळेच त्यांना मालिकेत २-२ अशी बरोबरी साधावी लागली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या