27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाजिल्हा मुलींच्या संघाने जिंकले कांस्य पदक

जिल्हा मुलींच्या संघाने जिंकले कांस्य पदक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
विभागीय क्रीडा संकूल औरंगाबाद येथे दि. ४ ते ६ जानेवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लातूर जिल्हा मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. कांस्यपदक विजेत्या संघात दिपाली पाटील, मुक्ता राऊत, कांचन सूर्यवंशी, नंदिनी ढोरमारे, प्रगती कांबळे, पवार नम्रता, पुजा कांबळे, पाटोळे स्रेहा, राजनंदिनी माने, दळवी वेदिका, धनगर प्रीती, जाधव वैष्णवी प्राप्ती खंडेलवाल, गौरी उपाध्याय व नम्रता कोलुगडे या खेळाडुंचा समावेश होता. विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश) येथे दि. ११ ते १५ जानेवारी दरम्यान होणा-या राष्ट्रीय स्पर्धासाठी जिल्ह्यातील मुलांच्या संघातून ओंकार सोरडे व मुलींच्या संघातून दिपाली पाटील या खेळाडूंची निवड झाली.
\
या संघाला प्रशिक्षक नारायण झीपरे, प्रज्वल जाधव, प्रेमराज पोळ, व्यंकटेश झीपरे व निलांबरी हिवाळे ( बिराजदार ) यांचे मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असो. सचिव प्रदिप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, पंच प्रमुख मुकुल देशपांडे, एनआयएस कोच किशोर चौधरी, एसएमआर शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. आशीष बाजपेई लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव डी. डी. पाटील, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, सचिन अडाणे, शिवाजी पाटील, सॉफ्टबॉल व बेसबॉल कोच मुकेश बिराजदार आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या