22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाजोकोविचची अमेरिकन ओपनमधून माघार

जोकोविचची अमेरिकन ओपनमधून माघार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून अर्थात यूएस ओपन २०२२ मधून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. स्पर्धा होणा-या न्यूयॉर्कमध्ये पोहोचणे शक्य नसल्याचे सांगत नोवाकने माघार घेतली. तसेच आपल्या चाहत्यांना त्यांनी दाखवलेल्या सपोर्ट आणि प्रेमासाठी धन्यवाददेखील मानले आहेत. तसेच लवकरच कोर्टावर परतू असेही तो म्हणाला.

दुर्दैवाने मी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला प्रवास करू शकणार नाही. तुमच्या प्रेम आणि समर्थनाच्या संदेशांसाठी धन्यवाद. माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा. मी चांगल्या स्थितीत आणि सकारात्मक भावनेत राहीन आणि पुन्हा स्पर्धेत खेळण्याच्या संधीची वाट पाहीन. लवकरच भेटू टेनिस जगतात, असेही ते म्हणाला.

अमेरिकेतील कोरोना निर्बंधांनुसार यूस ओपन स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक होते. पण जोकोविचने अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नव्हती. यामुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागणार होते. पण आता नव्या गाईडलाईन्सनुसार लशीची अनिवार्यता काढण्यात आली होती. त्यामुळे नोवाक स्पर्धेत सहभाग घेईल, असे वाटत होते. पण त्याने स्पर्धेला काही वेळच शिल्लक असताना आता माघार घेतल्याने टेनिस जगतात खळबळ उडाली आहे. याआधी कोरोना लशीला विरोध केल्याने नोवाकला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतही खेळण्याची परवानगी मिळाली नव्हती.

विम्बल्डन स्पर्धेत
ऐतिहासिक कामगिरी
विम्बल्डन २०२२ या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावले होते. जोकोविचने सलग चौथ्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. तसेच त्याच्याकडे २१ ग्रँडस्लॅम झाली आहेत. या कामगिरीसह त्याने रॉजर फेडररला मागे टाकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या