29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाजोहान्सबर्गवर भारताचा ७ विकेट्सने पराभव

जोहान्सबर्गवर भारताचा ७ विकेट्सने पराभव

एकमत ऑनलाईन

जोहान्सबर्ग : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर पार पडलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी आफ्रिकेच्या डीन एल्गर याने शेवटच्या डावात केलेल्या नाबाद ९६ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.

सामन्यात सर्वात आधी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली २०२ धावांवर पहिला डाव आटोपल्यानंतर भारताने गोलंदाजीला सुरुवात केली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या पीटरसन (६२) आणि बावुमा (५१) यांच्या मदतीने आफ्रिकेने २२९ धावा केल्यÞा. भारताला २७ धावांची पिछाडी मिळाली. तेव्हा भारताकडून रहाणे (५८) आणि पुजारा (५३) यांनी अर्धशतके झळकावली. तर विहारीने ४० धावा केल्याने भारताने २६६ धावा करत आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे आव्हान दिले. हे आव्हान एल्गारच्या नाबाद ९६ धावांनी आफ्रिकेने ६७.४ ओव्हरमध्ये पार करत सामना ७ विकेट्सनी जिंकला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या