28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाझिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर विजय

झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर विजय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रथम गोलंदाजी करताना झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला अवघ्या १४१ धावांत गुंडाळले. यानंतर ३९ व्या षटकात ७ गडी गमावून लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियातील या मैदानावर झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स घेत राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट ९ धावांवर गमावली. यानंतर एकामागून एक विकेट पडत राहिल्या आणि ७२ धावा झाल्या तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर एका टोकाला होता पण त्याला दुस-या टोकाकडून साथ मिळाली नाही. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना दुहेरीचा टप्पा गाठता आला.

डेव्हिड वॉर्नरने ९६ चेंडूंत ९४ धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेलने २२ चेंडूंत १९ धावा केल्या. उर्वरित ८ फलंदाज ० ते ५ च्या दरम्यान पॅव्हेलियनमध्ये परतले. अशाप्रकारे कांगारूचा संपूर्ण संघ ३१ षटकांत १४१ धावा करून ऑलआऊट झाला. झिम्बाब्वेकडून रायनने ३ षटकांत १० धावा देत ५ बळी घेतले.

१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने चांगली सुरुवात केली. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मात्र पहिली विकेट पडताच बॅक टू बॅक विकेट पडल्या आणि एका क्षणी झिम्बाब्वेनेही ७७ धावांपर्यंत मजल मारताना ५ विकेट गमावल्या. येथून कर्णधार रेगिसने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि पुढील दोन विकेटसाठी छोटी भागीदारी करून झिम्बाब्वेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेने ३९ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्य गाठले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या