23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाझिम्बाब्वे दौ-यासाठी प्रशिक्षकही बदलला, लक्ष्मणवर धुरा

झिम्बाब्वे दौ-यासाठी प्रशिक्षकही बदलला, लक्ष्मणवर धुरा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघात काय चालले आहे, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण गुरुवारी भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात आला. शिखर धवनकडून कर्णधारपद काढून लोकेश राहुलकडे देण्यात आले. त्यानंतर लगेचच शुक्रवारी या दौ-यासाठी भारताचा प्रशिक्षकही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झिम्बाब्वेच्या दौ-यासाठी राहुल द्रविड आता भारताच्या संघाचे प्रशिक्षक नसतील. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आगामी झिम्बाब्वे दौ-यासाठी भारताचे कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कारण यूएईमध्ये २७ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा सुरु होत आहे आणि त्यासाठी फारच कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे संघात हे बदल करण्यात आले आहेत, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी सांगितले.

व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रभारी प्रशिक्षक असतील. राहुल द्रविड विश्रांती घेत आहे, असा या गोष्टीचा अर्थ होत नाही. झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका २२ ऑगस्ट रोजी संपेल आणि द्रविडसह भारतीय संघासह २३ ऑगस्टला युएईसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे यामध्ये संघाला विश्रांती मिळणार नाही. संघाला आशिया चषकासाठी ताजेतवाने ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाचे प्रभारी प्रशिक्षक असतील.

झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय संघासोबत फक्त केएल राहुल आणि दीपक हुडाच आहेत. केएल राहुल आणि दीपक हुडा हे आशिया चषक संघाचा भाग असल्याने ते थेट हरारे येथून दुबईला जातील, असेही शाह यांनी यावेळी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या