26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाटीम इंडियासमोर १५४ धावांचे आव्हान

टीम इंडियासमोर १५४ धावांचे आव्हान

एकमत ऑनलाईन

रांची : रांचीच्या मैदानात सुरु असलेल्या दुस-या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मार्टिन गप्टील ३१ (१५), डॅरेल मिशेल ३१ (२८), ग्लेन फिलिप्स ३४ (२१) आणि टिम सेफर्ट १३ (१५) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजा दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणा-या हर्षल पटेलने दोन विकेट घेतल्या.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुस-या सामन्यातही नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टील आणि डॅरेल मिशेल या जोडीनं न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने संघाचा चांगली सुरुवात करुन दिली. मार्टिन गप्टील आक्रमक तो-यात दिसत होता. पण दीपक चाहरने त्याची विकेट घेत संघाला पहिले यश मिळवून दिले.

गप्टीलने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आणि पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणा-या मार्क चॅम्पमॅनला अक्षर पटेलने स्वस्तात माघारी धाडले. तो १७ चेंडूत २१ धावा करुन परतला. ग्लेन फिलिप्स ३१ आणि टिम सेफर्टने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही शेवटपर्यंत मैदानात थांबता आले नाही. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी त्यांचा डाव निर्धारित २० षटकात ६ बाद १५३ धावांत आटोपला. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणा-या हर्षल पटेलने दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर, अश्विन, अक्षर पटेल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या मैदानात रंगला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या