22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाडेव्हिड वॉर्नर झाला गणेशभक्तीत लीन

डेव्हिड वॉर्नर झाला गणेशभक्तीत लीन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. क्रीडा विश्वातही गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारख्या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांचे अभिनंदन केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही श्री गणेशाच्या भक्तीत तल्लीन दिसला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे भारतीय प्रेम कुणापासून लपलेले नाही. यावेळी भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या निमित्त गणपती बाप्पाच्या भक्तीत तो तल्लीन दिसला. त्याने बाप्पासोबतचा स्वत:चा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची भारतात चांगली फॅन फॉलोईंग आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट कारकीर्दीत व्यस्त असतानाही गणेश चतुर्थीनिमित्त त्याने खास पोस्ट करून करोडो भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

वॉर्नरने गणेशजींसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये भगवान गणेश विशाल रूपात दिसत आहेत. डेव्हिड वॉर्नर त्याच्या खाली दोन्ही हात जोडून उभा आहे. यादरम्यान वॉर्नरने आपल्या देशाची जर्सी परिधान केली आहे. फोटो शेअर करताना वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या