24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडादुस-या वन डेत भारताचा दमदार विजय

दुस-या वन डेत भारताचा दमदार विजय

एकमत ऑनलाईन

हरारे : भारताने झिम्बाब्वेचे १६२ धावांचा आव्हान ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत दुसरा वनडे सामना ५ विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था ४ बाद ९७ धावा अशी करून चांगली झुंज दिली होती. मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (२५) यांनी पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचविले.

भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने प्रत्येकी ३३ धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने ३८ धावा देत ३ बळी टिपले. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २ – ० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना २२ ऑगस्टला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या