23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडा...दुस-या ‘सारा’सोबत शुभमन गिल

…दुस-या ‘सारा’सोबत शुभमन गिल

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्टार सलामीवीर शुभमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका सारा अली खानसोबत दिसत आहे.
शुभमन गिल आणि सैफ अलीची मुलगी सारा अली खान एका रेस्टॉरंटमध्ये दिसली. सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की, शुभमन सारासोबत लंडनमध्ये डेटवर गेला आहे.

मात्र याआधीही शुभमन आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या नात्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र, दोघांनीही याची पुष्टी केली नाही.

चाहत्यांना थोडा वेळ वाटले की ही सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आहे, पण नंतर कळले की अभिनेत्री सारा अली खान आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार शुभमन सध्या लंडनमध्ये आहे, जिथे तो बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसत आहे. व्हायरल झालेला फोटो दुबईचा आहे, पण काही मीडिया रिपोर्टस्मध्ये याला लंडनचा फोटो म्हटले जात आहे. मात्र हा फोटो जिथे आहे तिथे चाहत्यांकडून त्यावर मजेशीर कमेंट्सही येत आहेत.

झिम्बाब्वेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याबद्दल ट्रेंड आला होता. पण अलीकडेच दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या होत्या. शुभमन गिल किंवा सारा तेंडुलकर या दोघांनीही या नात्याबद्दल कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१९ च्या आयपीएल दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

गिल सध्या इंग्लंडमध्ये आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर तो तेथे काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. झिम्बाब्वे दौ-यावर त्याने वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. या कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वे दौ-यावर तो ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या