24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडान्यूझीलंडविरुद्ध ऋतुराजचे शतक

न्यूझीलंडविरुद्ध ऋतुराजचे शतक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सलामीवीर ऋतुराज गायकवाडने संधी मिळेल, त्यावेळी भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना न्यूझीलंड अ संघाविरूद्ध तिस-या आणि अंतिम अनऑफिशिअल कसोटी सामन्यात दमदार शतकी खेळी केली.

या शतकी खेळीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडने भारतीय कसोटी संघाचे दारदेखील ठोठावले आहे. दुर्दैवाने ऋतुराजच्या शतकी खेळीनंतरही न्यूझीलंडने पहिल्याच दिवशी भारताचा डाव २९३ धावांवर संपवला.

ऋतुराज गायकवाडने गेल्या २४ महिन्यात फार कमी कसोटी सामने खेळले आहेत. मात्र तरी देखील न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकारदेखील मारले. ऋतुराजने भारताकडून आतापर्यंत ९ टी २० सामने खेळले आहेत.
त्याने न्यूझीलंड अ विरूद्धच्या कसोटी सामन्यात उपेंद्र यादवसोबत १३४ धावांची भागीदारी रचली. उपेंद्र यादवने ७६ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने भेदक मारा करत ४ बाद २४५ धावा करणा-या भारताचा डाव २९३ धावात संपुष्टात आणला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या