19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपंकज अडवाणीने पटकावला २५ वा विश्व करंडक

पंकज अडवाणीने पटकावला २५ वा विश्व करंडक

एकमत ऑनलाईन

मलेशिया : भारताचा अव्वल स्रूकरपटू पंकज अडवाणीने शनिवारी मलेशिया येथे जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बिलियर्ड्सच्या अंतिम फेरीत देशबांधव सौरव कोठारीचा ४-० असा पराभव करून कारकिर्दीतील २५वा जागतिक करंडक पटकावला. पंकजने १५० पेक्षा जास्त प्रकारांमध्ये १४९ च्या ब्रेकसह पहिली फ्रेम घेतली. तोपर्यंत कोठारी यांनी खातेही उघडले नव्हते.

या बेस्ट ऑफ सेव्हन अंतिम सामन्यामध्ये, अडवाणीने सुरुवातीपासूनच सर्वोत्तम प्रदर्शन केले. त्याने एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा बिलियर्ड्स राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. कोठारीला दुस-या फ्रेममध्ये काही संधी मिळाल्या. पण तो त्याचे सोने करू शकला नाही. दुसरीकडे अडवाणीने ७७ च्या ब्रेकच्या मदतीने २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र आपल्या कौशल्याने मलेशियाच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अडवाणीने तिस-या फ्रेममध्ये १५३ अंक पटकावले. चौथ्या फ्रेममध्ये ८० आणि ६० असे दोन ब्रेक घेत अडवाणीने ट्रॉफी ंिजकली. अडवाणीने ६६० हून अधिक गुण मिळवत किताब ंिजकला.

अडवाणी यांनी याआधी १२ महिन्यांपूर्वी कतारमध्ये शेवटची वर्ल्ड ट्रॉफी पटकावली आहे. त्यानंतर त्याने आयबीएसएफ ६-रेड स्रूकर वर्ल्ड कपमध्ये ट्रॉफी जिंकली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या