नवी दिल्ली :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. केएल राहुलच्या दुखापतीनंतर पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. तेव्हापासून मालिका संपेपर्यंत पंतच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता त्यामध्ये पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने ऋषभ पंतच्या फिटनेसवर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या जार्णाया ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत बॅटने कमाल दाखवू शकला नाही. फलंदाजीत तो फ्लॉप ठरला पण, शेवटच्या सामन्यात मोठी खेळी खेळून मालिका जिंकण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने फिटनेसवर मोठा आरोप करत त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, ऋषभ पंत विकेट कींिपग करताना पूर्णपणे बसू शकत नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. जेव्हा कोणी वेगवान गोलंदाजी करतो तेव्हा पंत उभा राहतो. तो पायाच्या बोटांवर बसत नाही. अशा परिस्थितीत त्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मला वाटते वजन वाढल्यामुळे असं होत असेल. तो जाडा असल्याने खाली बसल्यावर लवकर वर येता येत नाही. हा त्याच्या फिटनेसबाबत चिंतेचा विषय असू शकतो. पंत १०० टक्के फिट आहे का?