22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाब्रायन लारा हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक

ब्रायन लारा हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. सनरायजर्स हैदराबादने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीज आणि सनरायजर्स हैदराबाद संघाने परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर गेल्या मोसमात संघाचा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणा-या लाराला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

नुकतीच हैदराबादच्या संघाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ब्रायन लाराची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याची माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या