26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeक्रीडाब्रेट लीचा बुमराहला सल्ला

ब्रेट लीचा बुमराहला सल्ला

एकमत ऑनलाईन

सिडनी : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर झाला आहे. ही दुखापत बुमराहसह भारतीय संघासाठीही मोठी तोटादायक आहे. कारण बुमराहवर गोलंदाजीची अधिक धुरा सध्या संघात आहे. तो एकमेक अनुभवी आणि दमदार डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असल्याने संघात त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. दरम्यान आता बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी खास कानमंत्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दिला आहे.

ब्रेट ली त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, सध्या बहुतेक गोलंदाज जिममध्ये व्यायाम करताना अधिकाधिक वजन उचलतात. जिममध्ये व्यायाम करणे आवश्यक आहे, पण तुम्ही जास्त वजन उचलण्याची गरज नाही. जर तुम्हाला वेगवान गोलंदाजी करायची असेल तर तुमच्या शरीरात पातळ स्रायू असणे महत्त्वाचे आहे. जास्त वजन उचलल्याने हाताची हालचाल कमी होते. हा सल्ला देत बुमराहला अधिक वजन न उचलण्याचा सल्ला लीने दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या