पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिनाद) : भारत-वेस्ट इंडीजचा एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे पार पडला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरनेही गिलला साथ दिली. त्यामुळे भारताने बाजी मारली. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४० षटकांचा खेळवला गेला. याचा फायदा निश्चितच वेस्ट इंडीजला झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे रात्री १ वाजता सामना थांबला, तेव्हा भारत ३६ षटकांत २२५ धावा झाल्या होत्या. त्यावेळी गिल ९८ वर, तर सॅमसन ६ वर खेळत होते.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. मात्र, श्रेयस अय्यर ४४ धावा करून बाद झाला. मात्र, गिल पाय रोवून उभा होता. जोरदार फटकेबाजी करीत तो शतकाच्या जवळ पोहोचला. परंतु सामन्यात पावसाने वेळोवेळी व्यत्यय आणल्याने सामना थांबवावा लागला. तत्पूर्वी सूर्यकुमार यादव (८) स्वस्तात बाद झाला. रात्री १ च्या सुमारास ३६ षटकांचा सामना झाला होता. त्यावेळी धावसंख्या २२५ होती. पावसामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी ४० ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सरासरीत भारताची धावसंख्या घटली.
या सामन्यासाठी दोन्ही संघानी बदल केला. भारतीय संघात आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळाली. दुसरीकडे वेस्ट इंडीजमध्ये त्यांचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर जो कोरोनातून सावरुन आता संघात परतला आहे. वेस्ट इंडीजने जेसनसह आणखी दोन खेळाडू संघात घेतले आहेत. यामध्ये केसी कार्टी आणि किमो पॉल याचे नाव आहे. या तिघांच्या जागी संघात रोव्हमेन पॉवेल, रोमारियो शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ यांना विश्रांती देण्यात आली.