21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाभारताचे बॉक्सिंगपटू मारणार पदकांचा षटकार

भारताचे बॉक्सिंगपटू मारणार पदकांचा षटकार

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : भारताच्या बॉंिक्सगपटूंनी आता राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार पावले टाकली असून, आता भारतीय बॉंिक्सगपटू तब्बल ६ पदके जिंकत पदकांचा षटकार मारणार आहेत.

अमित पंघलने आज स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनविरुद्ध त्याच्या फ्लायवेट (४८-५१ किलो) उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून बॉंिक्सग रिंगमधून भारतासाठी सहावे पदक निश्चित केले. भारताचा हा सामना एकतर्फी झाली आणि त्यामुळेच अमितला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. पंघलने गोल्ड कोस्टमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यावेळी अमितच्या आक्रमणापुढे त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने हार मानल्याचे पाहायला मिळाले. अमितने चांगले आक्रमण केले, पण सोबत त्याचा बचावही उत्तम होता.

भारताच्या बॉक्सर्ससाठी आजचा दिवस चांगलाच यशस्वी ठरला. कारण आज फक्त अमितनेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला नाही, तर भारताच्या सागर आणि जयस्मिन यांनीही दमदार विजय मिळवत आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. सागरने सेशेल्सच्या केडी इव्हान्स अ‍ॅग्नेसवर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना भारतासाठी चांगलाच रंजकदार ठरला.

अमित आणि सागर यांच्याबरोबर जयस्मिननेही आज विजय साकारला. महिलांच्या ५७-६० किलो वजनी गटात जयस्मिनने ट्रॉय गॉटर्नवर ४-१ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीसह भारताचे पदक निश्चित केले. या तिघांबरोबरच निखत झरीन (५० किलो), नितू गंगास (४८ किलो) आणि मोहम्मद हुसमुद्दीन (५७ किलो) यांनीही आपापल्या गटात पदकांची निश्­िचती करण्यासाठी उपांत्य फेरी गाठली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या