24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाभारतीय कुस्तीपटूची पंचाशी हुज्जत

भारतीय कुस्तीपटूची पंचाशी हुज्जत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत सेवादलाचा सतेंदर सिंग हा मल्ल १२५ किलो वजनी गटात खेळण्यासाठी उतरला होता. यावेळी सतेंदरला पराभव पत्करावा लागला. पंचांनी सतेंदर पराभूत झाल्याचा निर्णय दिला. त्यानंतर सतेंदर हा पंचांशी हुज्जत घालण्यासाठी गेला होता. पण काही क्षणातच सतेंदरचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्याने पंचांनाच बेदम मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हीडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

सतेंदर मलिकचा हा सामना मोहित या कुस्तीपटूशी सुरु होता. या सामन्याची १८ सेकंद शिल्लक असताना त्याच्याकडे ३-० अशी आघाडी होती. पण त्यानंतर मोहितने सतेंदरला रिंग बाहेर ढकलले. त्यावेळी रिंगमधील रेफ्री यांनी एक गुण दिला होता. पण मोहितने यावेळी या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी परीक्षकांनी (ज्युरी) या पूर्ण घटनेचा व्हीडिओ रिप्ले पाहिला आणि मोहितला तीन गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही लढत अखेर ३-३ अशी बरोबरीत सुटली. पण अखेर ज्या खेळाडूने विजय मिळवला त्याला विजयी घोषित करण्याचा निर्णय परीक्षकांनी दिला.

याचाच अर्थ या लढतीत मोहितला विजयी ठरवण्यात आले आणि सतेंदरला पराभूत घोषित करण्यात आले. त्यावेळी सतेंदर हा चांगला भडकलेला पाहायला मिळाला. यावेळी सतेंदर हा परीक्षकांकडे गेला. या सामन्याचे परीक्षक हे सत्यदेव मलिक होते आणि ते सतेंदरच्या मोखरा या गावातीलच होते. सतेंदरने सुरुवातीला या निर्णयाचा निषेध केला आणि त्याने परीक्षकांकडे हुज्जत घातली.

माझ्या पराभवाचा निर्णय कसा घेण्यात आला, अशी विचारणा सतेंदरने केली. पण थोड्याच वेळात सतेंदरचा पारा चढला आणि त्यांनी सत्यदेव यांना बेदम मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. सतेंदरचे हे कृत्य खेळाला शोभणारे नक्कीच नाही. त्यामुळे यावेळी सतेंदरवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सतेंदरवरर आता आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या