26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी झुंबड; पोलिसांचा लाठीमार

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी झुंबड; पोलिसांचा लाठीमार

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : हैद्राबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा टी-२० सामना होणार आहे. या सामन्याची तिकीटे खरेदी करण्यासाठी प्रेक्षकांची हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झुंबड उडाली असून पोलिसांनी प्रेक्षकांच्या गर्दीवर लाठीमार केला.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी-२० सामन्यातील उद्या दुसरा सामना असून तिसरा सामना हैद्राबाद येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. २०९ धावांचे आव्हान देऊनही पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर उद्या दुसरा सामना होत असून यामध्ये कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भारतीय संघ आता शुक्रवारी दुस-या टी-२० सामन्यात नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे. त्याचबरोबर जसप्रित बुमराह आगामी सामन्यात खेळणार असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या