23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाभुवनेश्वरच्या पत्नीनेच त्याचे फेसबुक अकाऊंट केले हॅक

भुवनेश्वरच्या पत्नीनेच त्याचे फेसबुक अकाऊंट केले हॅक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत गणना केली जाते. भुवीच्या क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रंजक किस्से आहेत. भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागरने एकदा त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचे त्याने सांगितले होते, ज्याबद्दल आजही चर्चा केली जाते.

क्रिकबझच्या यूट्यूब शोमध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख करताना भुवनेश्वर कुमार म्हणाला होता की, तिने मला फेसबुकचा पासवर्ड विचारला, त्यावेळी मी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुस-या दिवशी तिने माझ्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड काय आहे तो मला सांगितला. त्यानंतर मला मोठा धक्का बसला. तिने अक्षरश: माझे खाते हॅक केले होते. तेव्हापासून मी फेसबुक वापरले नाही, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला होता. या शोमध्ये नुपूरही होती. मी भुवनेश्वरला अनेकदा सांगितले की, महिलांच्या इतक्या जवळून फोटो काढण्याची काय गरज आहे. त्यावेळी तो म्हणतो, जवळ येतात तर मी काय करू. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर खूप मुली मॅसेज करायच्या. याचा पासवर्ड माझ्याकडे होता, असे नुपूर म्हणाली.

भुवनेश्वर आणि नुपूर लहानपणीचे मित्र
भुवनेश्वर आणि नुपूर हे लहानपणीचे मित्र होते आणि दोघांनी २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर भुवनेश्वरची पत्नी नुपूरने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या खाजगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या