21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडामहाराष्ट्राच्या लेकीचा विश्वचषक स्पर्धेत इतिहास

महाराष्ट्राच्या लेकीचा विश्वचषक स्पर्धेत इतिहास

एकमत ऑनलाईन

क्रोएशिया : भारतीय नेमबाज आणि मराठमोळ्या राही सरनोबतने क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. राहीने अंतिम फेरीत ४० पैकी ३९ गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.

राहीने २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत फ्रेंच व रशियन नेमबाजांना मागे टाकत ही कामगिरी केली. अंतिम फेरीत मनु भाकेरला काही खास कामगिरी करता आली नाही आणि ती सातव्या स्थानावर राहिली. फ्रान्सची मॅथिलडे लामोलेला रौप्यपदक मिळाले. तिने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवले.

या विश्वचषक स्पर्धेमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. भारताने यापूर्वी एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. सरनोबतने मिळविलेले सुवर्णपदक हे विश्वचषक स्पर्धेमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. राहीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

‘त्या’ मृतदेहांची एसआयटी चौकशी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या