27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडामुंबईचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित

मुंबईचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित

एकमत ऑनलाईन

उत्तर प्रदेशविरुद्ध ३४६ धावांची आघाडी
बेंगळुरू : मुंबईने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत एकतर्फी वर्चस्व राखले आहे. मुंबईने गुरुवारी उत्तर प्रदेशचा पहिला डाव १८० धावांतच गुंडाळला आणि तिस-या दिवसअखेर दुस-या डावात १ बाद १३१ अशी भक्कम सुरुवात केली. तिस-या दिवसअखेर मुंबईने ३४६ धावांची आघाडी घेतल्यामुळे त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे.

माधव कौशिक आणि करण शर्मा या उत्तर प्रदेशच्या तिस-या जोडीने तिस-या दिवशी पहिल्या तासात मुंबईला यशापासून वंचित ठेवले होते. त्यांनी दुस-या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटल्यावर उत्तर प्रदेशचा डाव घसरला. २ बाद ६४ या परिस्थितीत उत्तर प्रदेशने ४३ धावात पाच विकेट गमावल्या. शिवम मावीने ५५ चेंडूंत ४८ धावांची आक्रमक खेळी केल्यामुळेच उत्तर प्रदेशला पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठता आला. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनिष कोटीयन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.

पहिल्या डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वी सावने आक्रमक अर्धशतक केले. त्यावेळी त्याचा साथीदार यशस्वी जयस्वाल केवळ खेळपट्टीवर उभे राहण्याचे काम करीत होता. पृथ्वी परतल्यावर यशस्वी आणि अरमानने मुंबईची आघाडी अधिक भक्कम करण्याकडे लक्ष दिले. त्यांना तिस-या दिवशी उत्तर प्रदेशला एकाच विकेटवर समाधान मानण्यास भाग पाडले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या