गंगाखेड : शहरातील कोद्री रोडच्या मैदानावर संपन्न झालेल्या ४९ व्या कुमार-कुमारी राज्य अंिजक्यपद कबड्डी स्पर्धेत दोन्ही गटाचे विजेतेपद मुंबई उपनगर संघाने पटकावले आहे. कुमार गटात मुंबई उपनगर विरूध्द अहमदनगर तर कुमारी गटात मुंबई उपनगर विरूध्द पुणे अशी लढत झाली.
त्यामध्ये शक्ती आणि युक्तींचा संगम करून मुंबई उपनगर संघाने आपले वर्चस्व सिध्द केले. विजेत्या मुलांच्या संघास स्व.नारायण नागू पाटील तर मुलींच्या संघास क्रीडाशिक्षक स्व.चंदन सखाराम पांडे यांच्या स्मरणार्थ फिरता चषक व विजेते दोन्ही संघास मातोश्री दगडूबाई गुट्टे कायमस्वरूपी चषक देऊन सहकारमंत्री अतुल सावे व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी समाजकल्याण सहायक आयुक्त गीता गुट्टे, युवा उद्योजक सुनिल गुट्टे, सोनम गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, बॉलिवुड पार्कचे व्यवस्थापक जयशिल मिजगर, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश रोकडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कोषाध्यक्ष मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र्र देसाई, स्मिता जाधव, सहाय्यक अभियंता बी.एम.पवार, जिल्हा नियोजनचे कैलाससिंह परदेशी, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, सरचिटणीस रवि कांबळे, तालुकाध्यक्ष राजेभाउ सातपुते, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, सचिव ऍड.मिंिलद क्षिरसागर, सतिश घोबाळे, पिराजी कांबळे, सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, उध्दव शिंदे, सचिन नाव्हेकर, अनिल यानपल्लेवार, सचिन महाजन, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, इकबाल चाऊस, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख, दिपक फुंदे, पप्पू घरजाळे उपस्थित होते.
मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान आयोजित चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत राज्यातील तब्बल ५० संघातले एकूण ६०० खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम सामने चुरशीचे झाल्याने खचाखच भरलेल्या प्रेक्षक गॅलरीतून प्रत्येक खेळाडूंसाठी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रोत्साहन देण्यात आलेÞ सामन्यातले दोन संघाकडे गुण कमी-जास्त होताना बघणारे अंदाज व्यक्त करीत होते. शेवटी, कुमारी गटातला सामना मुंबई उपनगरने ंिजकला.
तेव्हा सर्वाचे लक्ष कुमार गटाकडे लागले. तिथेही बरीचं झुंज बघायला मिळाली आणि तोही सामना मुंबई उपनगरने खिशात घातला. या स्पर्धेत कुमार गटात प्रथम मुंबई उपनगर, द्वितीय अहमदनगर, तृतीय पुणे, चतुर्थ ठाणे तर कुमारी गटात प्रथम मुंबई उपनगर, द्वितीय पुणे, तृतीय परभणी, चतुर्थ मुंबई शहर राहिले. याप्रसंगी मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान, राष्ट्रीय समाज पक्ष व आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, राज्यभरातून आलेले खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच यांच्यासह कबड्डी प्रेमी उपस्थित होते.